मुळा कारखाना कामगार संचालकपदी राजगुरू, डेरे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2021 04:16 IST2021-04-29T04:16:03+5:302021-04-29T04:16:03+5:30
नेवासा : तालुक्यातील मुळा सहकारी साखर कारखान्याच्या कामगार संचालकपदी शेतकी विभागातील कर्मचारी किशोर राजगुरू व सिव्हिल विभागातील कर्मचारी विश्वास ...

मुळा कारखाना कामगार संचालकपदी राजगुरू, डेरे
नेवासा : तालुक्यातील मुळा सहकारी साखर कारखान्याच्या कामगार संचालकपदी शेतकी विभागातील कर्मचारी किशोर राजगुरू व सिव्हिल विभागातील कर्मचारी विश्वास डेरे यांची नियुक्ती करण्यात आली.
नेवासा तालुका राष्ट्रीय साखर कामगार संघाचे सरचिटणीस नितीन पवार यांनी कामगार संचालक पदासाठी किशोर राजगुरू व विश्वास डेरे यांच्या नावाची शिफारस मुळा कारखाना संचालक मंडळाकडे केली होती. त्यानुसार त्यांची कारखाना संचालक मंडळावर कामगार प्रतिनिधी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. मृद व जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख ,कारखान्याचे अध्यक्ष नानासाहेब तुवर, उपाध्यक्ष कडूबाळ कर्डिले, कार्यकारी संचालक शरद बेल्हेकर, सचिव रितेश टेमक, वसंतराव भोर, कामगार संघटनेचे सरचिटणीस नितीन पवार, अध्यक्ष अशोकराव पवार, उपाध्यक्ष शिवाजी जाधव, सचिव डी. एम. निमसे, खजिनदार सुभाष सोनवणे व सर्व अधिकारी- कर्मचाऱ्यांनी नवनियुक्त कामगार संचालकांचे कौतुक केले.