शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी १९८४ पासून निवडणूक लढतेय, पण यावेळी..."; ममता संतापल्या, विजयासंदर्भात काय बोलून गेल्या? 
2
पत्राचाळ रहिवाशांना मोठा दिलासा! म्हाडा १० टक्के भाडेवाढ देणार; DCM एकनाथ शिंदेंचा निर्णय
3
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
4
MI vs SRH : वानखेडेवर Ryan Rickelton ची विक्रमी सेंच्युरी! तिलक वर्मासह जयसूर्याचा विक्रम मोडला
5
'No more Mr. Nice Guy', बंदुकीसह फोटो पोस्ट करत डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला पुन्हा धमकी
6
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
7
“छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी मान्य आहे का? एकनाथ शिंदे गप्प का?”: हर्षवर्धन सपकाळ
8
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
9
AI VS Humans : एआय की माणूस, कोण स्वस्त? दिग्गज टेक कंपनी NVIDIA सगळंच सांगितलं!
10
‘ही’ आहे पाकिस्तानची हायस्पीड ट्रेन, किती वेगाने जाते? वंदे भारत ट्रेनला देते का टक्कर? पाहा
11
केरळमध्ये 'लाल' किल्ला ढासळणार? एक्झिट पोलमध्ये काँग्रेसप्रणित UDF ची मोठी मुसंडी; विजयन यांची 'हॅट्ट्रिक' हुकणार!
12
विधानपरिषदेसाठी काँग्रेसही उमेदवार देणार? उद्धव ठाकरेंऐवजी अंबादास दानवेंच्या उमेदवारीमुळे चर्चांना उधाण
13
Top Marathi News LIVE Updates: नांदेडमध्ये तापमान ४४ अंशांवर; उष्णतेची तीव्र लाट
14
महाराष्ट्र माझा, मराठी माझी बोली भाषा! अमराठी चालकांसाठी परिवहन विभागाचा पुढाकार, पुस्तिकेचे प्रकाशन
15
१ महिन्यात २ अंगारक योग: संकष्ट-विनायक चतुर्थी ठरेल खास, गणपती बाप्पा शुभच करेल; काय करावे?
16
महाराष्ट्राचे AI धोरण जाहीर, हरित आयोग स्थापन, लंडन येथे अध्यासन केंद्र; मंत्रिमंडळाचे ७ मोठे निर्णय
17
महाराष्ट्राचे कृत्रिम बुद्धिमत्ता धोरण नेमके आहे तरी काय? AI मुळे किती नोकऱ्या मिळणार? वाचा
18
रोहितसह दुखापतीमुळे शतकवीरही OUT! MI कडून ओपनिंगचा नवा प्रयोग, मोठ्या बदलांसह मैदानात उतरला संघ
19
कितीही वाढूद्या, आम्ही खरेदी करणार...! १,५०,००० पार असूनही भारतात सोन्याची मागणी १० टक्क्यांनी वाढली
20
IPL मधील 'कमबॅक किंग' आहे Mumbai Indians! पाचवेळचा चॅम्पियन संघ Playoffs साठी किती वेळा ठरलाय पात्र?
Daily Top 2Weekly Top 5

राजळेंचा उद्या भाजपाप्रवेश!

By admin | Updated: September 23, 2014 23:03 IST

पाथर्डी/अहमदनगर : माजी आमदार राजीव राजळे व जिल्हा परिषदेच्या माजी उपाध्यक्षा मोनिका राजळे यांनी परळी येथे भाजपाच्या नेत्या पंकजा मुंडे यांची भेट घेतल्याने त्यांचा भाजपा प्रवेश निश्चित आहे.

पाथर्डी/अहमदनगर : माजी आमदार राजीव राजळे व जिल्हा परिषदेच्या माजी उपाध्यक्षा मोनिका राजळे यांनी परळी येथे भाजपाच्या नेत्या पंकजा मुंडे यांची भेट घेतल्याने त्यांचा भाजपा प्रवेश निश्चित झाल्याचे वृत्त आहे. गुरुवार, २५ रोजी त्यांचा भाजपा प्रवेश असून आगामी विधानसभा निवडणुकीत पाथर्डी-शेवगांव मतदारसंघातून मोनिका राजळे लढणार असल्याचे खात्रीलायक वृत्त हाती आले आहे. राजळे किंवा भाजपाकडून कोणताही अधिकृत दुजोरा मिळाला नसला तरी राजळेंचा बहुप्रतीक्षीत भाजपा प्रवेश निश्चित झाल्याने मतदारसंघातील गणिते बदलणार आहेत. दरम्यान, या अपेक्षीत घडामोडीबद्दल राष्ट्रवादीत कसलीही प्रतिक्रिया उमटलेली नाही. रविवारी माजी आ.राजीव राजळे , मोनिका राजळे, उद्योगपती लिंबाशेठ नागरगोजे, दिलीप लांडे, सोमनाथ खेडकर, संजय बडे, बंडू रासने आदिंनी परळी येथे जावून भाजपाच्या नेत्या आ.पंकजा मुंडे यांची भेट घेवून भाजपा पक्ष प्रवेश व आगामी विधानसभा निवडणुकीबाबत चर्चा केल्याचे वृत्त आज दिवसभर जिल्ह्यात चर्चेत होते. आ.मुंडे यांनी राजळेंच्या पक्षप्रवेशाला हिरवा कंदील दाखवल्याचे समजते. आगामी विधानसभा निवडणुकीत शेवगाव-पाथर्डी मतदारसंघात आ.चंद्रशेखर घुले यांना आव्हान फक्त राजळेच देवू शकतात. त्यामुळे मोनिका राजळेंची उमेदवारी निश्चित असल्याचा दावा राजळे समर्थक गेल्या काही दिवसांपासून करत होते. त्याला आता बळकटी येत आहे. मोनिका राजळे यांच्या भाजपा उमेदवारीचे स्पष्ट संकेत वरिष्ठ भाजपा नेत्यांनी तसेच आ.पंकजा मुंडे यांनी दिल्याचे म्हटले जात आहे. तसेच मतदारसंघातील जुन्या भाजपा नेत्यांना विश्वासात घेवून पावले उचलावीत असेही त्यांनी सुचविल्याचे कळते. माजी आ.राजळे हे मुंबई येथे जाणार असून ते पक्षातील वरिष्ठ नेत्यांना भेटणार असून येत्या २५ तारखेला मुंबई येथे पक्षसोहळा होणार असल्याचे म्हटले जाते. दरम्यान, माजी आ.राजीव राजळे यांचा भाजपा प्रवेश व संभाव्य उमेदवारी राजळे घराण्यातील असणार हे लक्षात घेवून आ.चंद्रशेखर घुले यांनी आधीच तयारी केली आहे. तसेच तालुक्यातील महत्वाच्या व विश्वासू कार्यकर्त्यांची बैठक घेवून निवडणुकीत काय रणनीती आखायची याबाबत चर्चा केली. एकूणच राजळेंच्या उमेदवारीचा आ.घुले यांनी धसका घेतल्याची चर्चा आहे.मंगळवारी दिवसभर आ.पंकजा मुंडे, मोनिका राजळे आणि राजीव राजळे यांचे छायाचित्र सोशल मीडियावर फिरत होते. त्यामुळे राजळेंच्या भाजपा प्रवेशाची केवळ औपचारिकता शिल्लक असल्याचे म्हटले जात होते. यामुळे भाजपाचे निष्ठावान मात्र चक्रावून गेल्याचे दिसले. याबाबत भाजपाचे इच्छुक उमेदवार व ज्येष्ठ नेते अशोकराव गर्जे यांना विचारले असता ते म्हणाले, भारतीय जनता पक्षात जो कोणी येईल त्याचे आम्ही स्वागतच करू. परंतु विधानसभा निवडणुकीच्या उमेदवारीबाबत आ.पंकजा मुंडे व वरिष्ठ भाजपा नेत्यांनी निष्ठावंतांनाच उमेदवारी दिली जाईल असा शब्द दिलेला आहे. काहीही झाले तरी निष्ठावंत कार्यकर्त्यालाच उमेदवारी मिळेल असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला. (तालुका प्रतिनिधी)गांधी गटाचा विरोधदरम्यान, राजळेंच्या पक्ष प्रवेशाला भाजपातील खा.दिलीप गांधी गटाने विरोध केल्याचे वृत्त आहे. ही चर्चाच त्यांनी फेटाळून लावल्याचे म्हटले जाते. गांधी यांना लोकसभा निवडणुकीत राजीव राजळे यांच्याशी लढत द्यावी लागली होती. मंगळवारी मुंबईतील भाजपा बैठकीत याबाबत कोणतीही चर्चा झाली नाही, असे कळते. यापूर्वी गांधी समर्थकांनी बबनराव पाचपुते यांच्याही भाजपा प्रवेशाला जाहीर विरोध केला होता.