हॉलमार्कचा बनावट शिक्का मारून दोन कोटींचे कर्ज उचलले
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 13, 2022 14:25 IST2022-09-13T14:25:09+5:302022-09-13T14:25:24+5:30
बेन्टेक्स वर हॉलमार्कचा बनावट शिक्का मारून शहर सहकारी बँकेत तारण ठेवून तब्बल दोन कोटी वीस लाख रुपयांचे कर्ज उचलण्याचा प्रकार समोर आला आहे.

हॉलमार्कचा बनावट शिक्का मारून दोन कोटींचे कर्ज उचलले
अण्णा नवथर
अहमदनगर
बेन्टेक्स वर हॉलमार्कचा बनावट शिक्का मारून शहर सहकारी बँकेत तारण ठेवून तब्बल दोन कोटी वीस लाख रुपयांचे कर्ज उचलण्याचा प्रकार समोर आला आहे.
अहमदनगर शहर सहकारी बँकेत बनावट सोने तारण ठेवून दोन कोटी वीस लाख रुपयांचे कर्ज उचलल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे . बँकेकडून नियुक्त करण्यात आलेल्या गोल्ड व्हॅलीवरने 5,900 ग्राम बनावट सोने कारण ठेवून 23 जणांना एकूण दोन कोटी वीस लाख रुपयांचे कर्ज वाटप केल्याचे समोर आले असून,हा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे ,अशी माहिती पोलिसांकडून देण्यात आली.