शहरं
Join us  
Trending Stories
1
शटडाऊनमुळे अमेरिका मोठ्या संकटात; ७.५० लाख सरकारी कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
2
टीका, हल्ले झाले तरी संघाने कधीही कटुता बाळगली नाही; पंतप्रधान मोदी यांचे प्रतिपादन : ‘राष्ट्र प्रथम’ हे संघाचे तत्त्व महत्त्वाचे
3
केंद्रीय मंत्रिमंडळाची दसरा भेट : ४९.१९ लाख केंद्रीय कर्मचाऱ्यांसह ६८.७२ लाख निवृत्तीवेतनधारकांना मिळणार लाभ
4
भ्रष्टाचारात महाराष्ट्र सलग तिसऱ्या वर्षी देशात टॉप; पुण्यात सर्वाधिक लाचखोर!
5
ईएमआय भरले म्हणून पती संयुक्त मालमत्तेवर एकट्याने मालकीचा दावा करू शकत नाही!
6
५७ केंद्रीय विद्यालयांना केंद्राने दिली मंजुरी; महाराष्ट्रातील चार जिल्ह्यांचा यादीत समावेश
7
अनुकंपाच्या तब्बल ५,१८७ उमेदवारांना मिळणार नियुक्तिपत्रे; एकाच दिवशी १० हजार जण नोकरीत हाेणार रुजू
8
ट्रम्प यांच्या योजनेला हमास मान्यता देईना; इस्रायलने गाझावर केलेल्या हल्ल्यात १६ जण ठार
9
"कतारवर हल्ला म्हणजे अमेरिकेवर हल्ला, पुन्हा असं घडलं तर..."; ट्रम्प यांचा इस्रायलला इशारा
10
"माझ्या पतीची बिनशर्त सुटका करा..."; सोनम वांगचुक यांच्या पत्नीचे थेट राष्ट्रपतींना पत्र
11
भिवंडीतील मानकोली येथे वह्या बनवणाऱ्या कंपनीच्या गोदामाला आग; सुदैवाने जीवितहानी नाही
12
महाराष्ट्रातील हॉटेल, दुकाने आता २४ तास सुरू राहणार; पण 'या' आस्थापनांवर मात्र निर्बंध कायम
13
“मराठा समाजाला आरक्षणाची अत्यंत गरज, पण सरकारने...”; खासदार शाहू महाराजांनी व्यक्त केली खंत
14
ठाणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागप्रमुखाला २५ लाखांची लाच घेताना अटक; अगोदर घेतलेले १० लाख
15
मंत्रालयातील लूटीला चाप बसणार! सल्लागारांच्या नियुक्त्यांमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी निर्णय
16
GST घटला, पण सरकारचा खजिना भरला, सप्टेंबर महिन्यात झाली विक्रमी कमाई   
17
ICC Womens World Cup : 'लेडी मॅक्सवेल'ची विक्रमी सेंच्युरी; असा पराक्रम करणारी ठरली पहिली बॅटर
18
मुंबई मनपा निवडणुकीपूर्वी उद्धवसेनेला मोठा धक्का; ‘या’ गटाचे प्रमुख, पदाधिकारी शिवसेनेत
19
VIDEO: परंपरा.. प्रतिष्ठा.. अनुशासन.. 'या' ठिकाणी पुरूष साडी नेसून करतात गरबा, कारण...
20
“वाट कसली पाहता? शेतकरी भाजपात आल्यावर कर्जमुक्ती करणार का?”; उद्धव ठाकरेंचा थेट सवाल

शेवगाव, जामखेड तालुक्यात पाऊस

By admin | Updated: October 9, 2014 00:12 IST

शेवगाव : शेवगावसह परिसरातील घोटण, कऱ्हेटाकळी, खानापूर, आंतरवाली, एरंडगाव आदी भागात मंगळवारी रात्री जोरदार पाऊस झाला.

शेवगाव : शेवगावसह परिसरातील घोटण, कऱ्हेटाकळी, खानापूर, आंतरवाली, एरंडगाव आदी भागात मंगळवारी रात्री जोरदार पाऊस झाला. त्यामुळे दीर्घकाळ पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. तालुक्यातील बोधेगाव, चापडगाव, भातकुडगाव व ढोरजळगाव परिसरातील अनेक गावे अजुनही पावसाच्या प्रतीक्षेत असल्याने शेतकऱ्यासह सर्वांची काळजी वाढली आहे. यंदाचा पावसाळा शेवगाव तालुक्यासाठी ‘कहीं खुशी कही गम’ अशा पद्धतीचा ठरला आहे. पावसाळ्याच्या सुरुवातीचा तब्बल अडीच महिन्याचा मोठा कालावधी कोरडा गेला. मध्यंतरीची आॅगस्ट आणि सप्टेंबर या कालावधीत समाधानकारक जोरदार पाऊस झाला. गणपती उत्सवानंतर मात्र पावसाने पाठ फिरविल्याने रब्बी पिके धोक्यात आली आहेत. मात्र मंगळवारच्या पावसाने कापूस, ऊस, ज्वारी, गहू, हरभरा आदी पिकांना जीवदान मिळाले आहे. बुधवारी सकाळी संपलेल्या २४ तासात शेवगाव परिसरात ६३ मि.मी. तर एरंडगाव परिसरात ८ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. मात्र भातकुडगाव, बोधेगाव, चापडगाव व ढोरजळगाव परिसर पावसाबाबत निरंक असल्याची माहिती तहसील कार्यालयातून सांगण्यात आली. गेल्या काही दिवसात उष्णतामान कमालीचे वाढले असून, जनता आॅक्टोबर हीटचा अनुभव घेत आहे. एकीकडे लांबलेला पाऊस तर दुसरीकडे भारनियमनात मोठी वाढ झाल्याने जनतेची कोंडी सुरू आहे.(तालुका प्रतिनिधी)जामखेडला पाऊस, रब्बीला जीवदानजामखेडसह तालुक्यातील खर्डा, हळगाव, नान्नज, जवळा परिसरात बुधवारी पावसाने हजेरी लावली. या पावसामुळे रब्बी पिकांना जीवदान मिळणार आहे. गेल्या पंधरा दिवसांपासून उन्हाचा कडाका वाढला होता. गेल्या दोन दिवसांपासून ढगाळ हवामान होते. त्यामुळे पावसाची शक्यता वाढली होती. रब्बी ज्वारी पेरण्या तालुक्यात ५० टक्केपेक्षा जास्त झाल्या होत्या. काही ठिकाणी पिके उगवून आली होती. त्यामुळे या पिकांना पावसाची गरज होती. मंगळवारी जामखेड व व तालुक्याच्या काही भागात पावसाने हजेरी लावली. जामखेड दोन मि.मी., नान्नज २४ मि.मि.,अरणगाव १०.५ मि.मी., नायगाव येथे दोन मि.मी. अशी पावसाची नोंद झाली होती.