कुकडी पाणलोट क्षेत्रात पाऊस थंडावला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2021 04:26 IST2021-09-04T04:26:31+5:302021-09-04T04:26:31+5:30
श्रीगोंदा : कुकडी प्रकल्प लाभक्षेत्रात यंदा पावसाचे प्रमाण खूपच कमी असून, पाणलोट क्षेत्रातील पाऊस ओसरला आहे. कुकडीत यंदा गेल्या ...

कुकडी पाणलोट क्षेत्रात पाऊस थंडावला
श्रीगोंदा : कुकडी प्रकल्प लाभक्षेत्रात यंदा पावसाचे प्रमाण खूपच कमी असून, पाणलोट क्षेत्रातील पाऊस ओसरला आहे. कुकडीत यंदा गेल्या वर्षी पेक्षा आठ टक्के कमी पाणीसाठा आहे. यामध्ये येडगाव, घोड धरणाची घागर रिकामी, तर माणिकडोह ४७ टक्के भरले आहे. त्यामुळे शेती आवर्तनावरच प्रश्नचिन्ह उभे राहिले असून, शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.
२ सप्टेंबरअखेर कुकडी प्रकल्पात १८ हजार ६०१ एमसीएफटी (६१ टक्के) पाणीसाठा आहे. गेल्या वर्षी हा पाणीसाठा २१ हजार ०६३ एमसीएफटी इतका होता. म्हणजे पाणी साठ्यात यंदा ३ एमसीएफटी पाण्याची तूट आहे.
कुकडी प्रकल्पात १८ टीएमसी उपयुक्त पाणीसाठा आहे. यामध्ये डिंबे धरणात ११ टीएमसी पाणी आहे. डिंबे धरणातील दोन ते अडीच टीएमसी पाणी मिळू शकते. त्यामुळे यंदा कुकडी लाभक्षेत्रातील पारनेर, श्रीगोंदा, कर्जत, करमाळा परिसरातील शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे सावट आहे.
...............
धरण पाणीसाठा टक्केवारी आणि एकूण पाऊस
येडगाव ६८२ एमसीएफटी ३५ टक्के ३३४ मिलिमीटर.
माणिकडोह ४७७८ एमसीएफटी ४७ टक्के ५७९ मिलिमीटर
वडज ८३६ एमसीएफटी ७१ टक्के ३५७ मिलिमीटर
डिंबे ११०१८ एमसीएफटी ८८% ७२८ मिलिमीटर
पिंपळगाव जोगे १२८६ एमसीएफटी ३४ टक्के ५३ मिलिमीटर
घोड १०३२ एमसीएफटी २१ टक्के २८६ मिलिमीटर
विसापूर ९० एमसीएफटी १० टक्के पाऊस ८६ मिलिमीटर
सीना ८९४ एमसीएफटी ४८ टक्के ३८६ मिलिमीटर
खैरी ४४ एमसीएफटी ९ टक्के १३६ मिलिमीटर
...................
डिंबे माणिकडोह बोगदा
नगरकरांना डिंबेतील हक्काचे सहा टीएमसी पाणी व माणिकडोह धरणातील तीन टीएमसी पाण्याची तूट भरून काढण्यासाठी डिंबे माणिकडोह जोड बोगद्याचे काम होणे आवश्यक आहे. हे काम बोगदा तळ पृष्ठ निश्चितीवरून आडले आहे. कृष्णा खोरे विकास महामंडळाचे मुख्य अभियंतापदी श्रीगोंद्याचे भूमिपुत्र हेमंत धुमाळ यांची निवड झाली. त्यामुळे या प्रश्नाला दिशा मिळण्याची आशा आहे.