शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

मुळा, भंडारदरा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2019 11:37 IST

भंडारदरा आणि मुळा धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पाच दिवसानंतर मुसळधार पाऊस झाला.

अकोले/राजूर/भंडारदरा/ राहुरी : भंडारदरा आणि मुळा धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पाच दिवसानंतर मुसळधार पाऊस झाला़ काही गावांना पुन्हा एकदा अतिवृष्टीचा तडाखा बसला. रतनवाडी येथे सुमारे १४ इंच पावसाची नोंद झाली. भंडारदरा धरणातील पाणीसाठा ४ हजार दशलक्ष घनफूट तर मुळा धरणात गुरुवारी सायंकाळी ६ हजार २२४ दशलक्ष घनफूट पाणी साठ्याची नोंद झाली़अकोले तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यात बुधवारी दिवसभर पावसाची उघड झाप चालू होती. रात्री उशिरा जोरदार पावसाच्या सरी कोसळू लागल्या. परिसरातील रतनवाडी शिवारास पावसाने झोडपून काढले़ रात्री सुरू झालेला हा पाऊस गुरुवारी सकाळपर्यंत कोसळत होता. गुरुवारी सकाळी संपलेल्या चोवीस तासांत रतनवाडी येथे ३४२, घाटघर येथे २१५,वाकी येथे १५२, भंडारदरा येथे १४०, पांजरे येथे १३१ मिलिमीटर पावसाची नोंद झाली.भंडारदरा धरणात दिवसभरात ५७० दशलक्ष घनफूट नवीन पाणी दाखल झाले़ निळवंडे धरणातील पाणी साठा सायंकाळी सहा वाजता १ हजार ४०६ दशलक्ष घनफुटापर्यंत पोहचला होता. प्रवरा खोऱ्यातील टिटवी येथील ३०२ दशलक्ष घनफूट क्षमतेचा लघु पाटबंधारे तलाव ओव्हर फ्लो झाला. कळसूबाई परिसरातील वाकी येथील लघु पाटबंधारे तलावावरील विसर्गात वाढ झाली असून सायंकाळी सहा वाजता हा विसर्ग ७८९ क्युसेक इतका होता. कुरकुंडी नदीवरील २०२ दशलक्ष घनफूट क्षमतेचा बलठण येथील लघु पाटबंधारे तलाव सकाळी भरून वाहू लागला.कोतूळ : हरिश्चंद्रगड व पाचनईसह मुळा नदीच्या लाभक्षेत्रात मंगळवारी व बुधवारी जोरदार पाऊस पडत असल्याने गुरुवारी दुपारी मुळा नदीचा विसर्ग ३० हजार क्युसेक इतका झाल्याने नदी काठावरील रहिवाशांना सावधानतेचा इशारा पाटबंधारे विभागाचे उपअभियंता रामनाथ आरोटे यांनी दिला आहे.सांगवी धरण भरणारगणोरे : आढळा नदीपात्रातील लघु पाटबंधारे प्रकल्पाच्या पाडोशी धरणातील ओव्हरफ्लोच्या पाण्याने सांगवी धरण भरण्याच्या मार्गावर आहे. पाणलोटातील पावसामुळे पाडोशी धरणात पाण्याची आवक वाढली आहे. शुक्रवारी आढळा धरणाच्या पाणलोटक्षेत्रात नदी वाहती होण्याची चिन्हे आहेत. पाडोशी व सांगवी हे दोन्ही प्रकल्प देवठाण येथील आढळा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात आहेत. नदी पात्रातील साठवण बंधारे भरून पाणी थेट देवठाण येथील आढळा धरणात येण्याची शेतकऱ्यांना प्रतीक्षा आहे.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरAkoleअकोले