नाशिक येथील पथकाचा हुक्का पार्लरवर छापा; हॉटेलमधील पाच जण पोलिसांच्या ताब्यात
By अण्णा नवथर | Updated: July 21, 2023 10:53 IST2023-07-21T10:49:57+5:302023-07-21T10:53:40+5:30
सर्जेपुरा येथील इंगळे कॉम्प्लेक्स मध्ये तळमजदार हुक्का पार्लर सुरू असल्याची माहिती गुप्तमी दारा मार्फत नाशिक येथील पथकाला मिळाली होती.

नाशिक येथील पथकाचा हुक्का पार्लरवर छापा; हॉटेलमधील पाच जण पोलिसांच्या ताब्यात
अहमदनगर: अहमदनगर येथील सर्जेपुरा परिसरात एका तळमजल्यावर सुरू असलेल्या हुक्का पार्लरवर नाशिक येथील पोलीस महानिरीक्षक बि.जी. शेखर पाटील यांच्या पथकाने नऊ जणांना ताब्यात घेतले असेल एकूण बारा हजार रुपयांचा जप्त करण्यात आला आहे.
सर्जेपुरा येथील इंगळे कॉम्प्लेक्स मध्ये तळमजदार हुक्का पार्लर सुरू असल्याची माहिती गुप्तमी दारा मार्फत नाशिक येथील पथकाला मिळाली होती. त्यानुसार पथकाने हुक्का पार्लर वर छापा टाकत येथील नऊ जणांना ताब्यात घेतले असून, हुक्का पार्लर साठी वापरले जाणारे साहित्य, सुगंधी तंबाखू आदी एकूण १२ हजार रुपयांचे साहित्य जप्त करण्यात आले आहे