राहुरी काॅलेज ते नगर-मनमाड रोड तात्पुरता बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2021 04:18 IST2021-01-18T04:18:15+5:302021-01-18T04:18:15+5:30
मतमोजणी प्रक्रियेदरम्यान इतर गावावरून येणाऱ्या लोकांची संख्या व वाहनांची संख्या याचा विचार करून, राहुरी शहरामध्ये कोणताही अनुचित प्रकार घडू ...

राहुरी काॅलेज ते नगर-मनमाड रोड तात्पुरता बंद
मतमोजणी प्रक्रियेदरम्यान इतर गावावरून येणाऱ्या लोकांची संख्या व वाहनांची संख्या याचा विचार करून, राहुरी शहरामध्ये कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी योग्य ते नियोजन करण्यात आला आहे. त्याबाबतचे आदेश निर्गमित करण्यात आले आहेत. मतमोजणी प्रक्रिया पाहण्यासाठी व ऐकण्यासाठी येणाऱ्या ग्रामस्थांची वाहने पार्किंग करण्याची सोय पूर्वेकडून येणाऱ्या वाहनांसाठी काॅलेजच्या मागील पाकिग या ठिकाणी, तसेच पश्चिमेकडून येणाऱ्या वाहनांची सोय रिलायन्स पॅटोल पंपाजवळ, नगर-मनमाड रोड (राहुरी) या ठिकाणी करण्यात आली आहे. त्यामुळे सर्व ग्रामस्थांना वर नमूद केल्याप्रमाणे वाहने पार्किंग करण्याबाबत पोलिसांकडून आवाहन करण्यात येत आहे. विजयी उमेदवार यांनी जिल्हाधिकारी यांच्या आदेशाचे काटेकोर पालन करावे. तसे न केल्यास व काही अनुचित प्रकार घडल्यास पोलीस विभागाकडून कडक कारवाई करण्यात येईल, असे राहुरी पोलीस निरीक्षक यांनी हनुमंत गाडे यांनी सांगितले.