शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
6
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
7
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
8
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
9
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
10
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
11
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
12
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
13
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
14
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
15
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
16
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
17
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
18
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
19
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
20
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
Daily Top 2Weekly Top 5

राहुल झावरे-सुजित झावरे एकाच व्यासपीठावर

By admin | Updated: August 19, 2014 23:27 IST

पारनेर: जिल्हा काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल झावरे व राष्ट्रवादीचे जिल्हा परिषद सदस्य सुजित झावरे हे प्रथमच एका व्यासपीठावर आले

पारनेर: नंदकुमार झावरे व वसंतराव झावरे यांचे गेल्या नऊ वर्षांत वितुष्ट असल्याने त्यांचे दोन्ही सुपुत्र कधीही एकत्र आले नाहीत. मात्र मंगळवारी जिल्हा काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल झावरे व राष्ट्रवादीचे जिल्हा परिषद सदस्य सुजित झावरे हे प्रथमच एका व्यासपीठावर आले आणि अनेकांच्या भुवया उंचावल्या. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पारनेर मतदारसंघातील नवी राजकीय कलाटणी म्हणूनही या घडामोडीकडे पाहिले जात आहे. काँग्रेस नेते नंदकुमार झावरे व राष्ट्रवादीचे नेते वसंतराव झावरे या दोन माजी आमदारांमध्ये विळया-भोपळयाचे नाते आहे. वसंतराव झावरे यांचा २००४ च्या विधानसभा निवडणुकीत पराभव करून विजय औटी यांना आमदार करण्यात नंदकुमार झावरे ‘किंगमेकर’ ठरले. नंतर वसंतराव झावरे यांनी नंदकुमार झावरे यांच्याशी जुळवून घेताना सुजित झावरे यांचे जिल्हा परिषदेत यश पदरात पाडून घेतले तर जिल्हा बँकेत पुन्हा नंदकुमार झावरे यांचा पराभव करून जुना हिशेबही चुकता केला. त्यानंतर दोघांत वितुष्ट कायम आहे. या वितुष्टामुळे राष्ट्रवादी व काँग्रेस पारनेर तालुक्यात मित्रपक्ष असूनही एकमेकांचे कट्टर स्पर्धक म्हणूनच पाहतात. यामुळे त्यांचे सुुपुत्र सुजित झावरे व राहुल झावरे यांनीह एकत्र येणे टाळले.दोघे एकत्र येत नसल्याने सेनेचे आमदार विजय औटी हे आम्हाला सापत्नपणाची वागणूक देतात असे कार्यकर्त्यांचे म्हणणे होते. निघोजचे सरपंच संदीप वराळ, राष्ट्रवादीचे उमेश सोनवणे,सोमनाथ वरखडे यांनी दोन्ही युवा झावरे यांना हा प्रकार सांगितला. दोन्ही काँग्रेसने एकत्र यावे अशी मागणी त्यांनी लावून धरली. राहुल आणि सुजित या दोघांकडूनही होकार आल्यानंतर मंंगळवारी विविध कामांच्या उद्घाटनाच्या निमित्ताने निघोज येथे राहुल झावरे व सुजित झावरे यांच्यासह काँग्रेसचे तालुकाध्यक्ष डॉ. भास्कर शिरोळे व राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष पोपट पवार, राहुल शिंदे, शैलेंद्र औटी, संदीप सालके, दीपक नाईक हे सर्व नेते एका व्यासपीठावर आले. उपस्थितांनीही भाषणातून दोन्ही काँग्रेसने व दोन्ही झावरे यांनी एकत्र रहावे, अशी साद घातली. यात संदीप वराळ, सुजित झावरे, डॉ. शिरोळे यांनी आमदार औटी यांच्यावर कडाडून टीका केली. झावरेद्वयींनीही भविष्यात किमान विकासकामांसाठी एकत्र येऊन लढा देऊ असे सांगितले. पारनेरच्या राजकारणात युवा पिढीचे नवे राजकारण सध्या चर्चेचा विषय ठरला आहे. (तालुका प्रतिनिधी)