मुळा धरण ७५ टक्के भरण्याच्या मार्गावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2021 04:25 IST2021-09-05T04:25:15+5:302021-09-05T04:25:15+5:30
मुळा धरणात गेल्या वर्षी २ सप्टेंबरला मुळा धरणांतून जायकवाडीला पाणी सोडण्यात आले होते. मात्र, यंदा मुळा धरणात पाण्याचा ...

मुळा धरण ७५ टक्के भरण्याच्या मार्गावर
मुळा धरणात गेल्या वर्षी २ सप्टेंबरला मुळा धरणांतून जायकवाडीला पाणी सोडण्यात आले होते. मात्र, यंदा मुळा धरणात पाण्याचा साठा गेल्या वर्षीच्या तुलनेत कमी आहे. मुळा धरण पूर्ण क्षमतेने भरण्यासाठी आणखी पावसाची गरज आहे. मुळा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सहा ते नऊ सप्टेंबर या दरम्यान पाऊस पडण्याची शक्यता आहे. हवामान खात्याने पाऊस पडण्याची शक्यता व्यक्त केली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहे.
.......................
गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा मुळा धरणात पाण्याचा साठा कमी आहे. मात्र, नजीकच्या काळात पाणलोट क्षेत्रात पाऊस हजेरी लावणार आहे. लाभ क्षेत्रावर पावसाने हजेरी लावल्यामुळे सध्या दोन्ही कालव्यातून पाण्याची मागणी होत नाही. त्यामुळे कालवे बंद आहेत.
-अण्णासाहेब आंधळे, मुळा धरण, शाखा अभियंता