मुळा धरण ८८ टक्के भरले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2017 18:13 IST2017-09-10T18:12:30+5:302017-09-10T18:13:11+5:30
प्रदीर्घ विश्रांतीनंतर मुळा धरण पाणलोट क्षेत्रात रविवारी पहाटेपासून पावसाने हजेरी लावली़ धरणातील पाण्याचा साठा २३ हजार दशलक्ष घनफुटावर पोहचला असून धरण ८८ टक्के भरले आहे. धरणाकडे १४०० क्यूसेकने पाण्याची आवक सुरू आहे़

मुळा धरण ८८ टक्के भरले
मुळा धरण ८८ टक्के भरले
राहुरी : प्रदीर्घ विश्रांतीनंतर मुळा धरण पाणलोट क्षेत्रात रविवारी पहाटेपासून पावसाने हजेरी लावली़ धरणातील पाण्याचा साठा २३ हजार दशलक्ष घनफुटावर पोहचला असून धरण ८८ टक्के भरले आहे. धरणाकडे १४०० क्यूसेकने पाण्याची आवक सुरू आहे़
मुळा धरणावर गेल्या दहा बारा दिवसांपासून पावसाने दडी मारली होती़ त्यामुळे धरणाची पाणी पातळी स्थिरावली होती़ आता २६ हजार दशलक्ष घनफूट पाणी साठा झाल्यानंतर धरण पूर्ण क्षमतेन भरणार आहे़ संभाव्य मुळा धरणातील पाण्याचा साठा लक्षात घेता मुळा नदीपात्रात असलेल्या डिग्रस बंधा-याच्या फळ्या काढण्यात आल्या आहेत़
मुळा धरणाच्या डाव्या कालव्यातून मुसळवाडी तलावासाठी आठ दिवसांपासून पाण्याचे आवर्तन सुरू आहे़ रविवारी दिवसभर ढगाळ वातावरण होते़ पाणलोट क्षेत्रावर हलक्या पावसाच्या सरीने हजेरी लावली़ राहुरी परिसरात दुपारी काही वेळ पावसाने हजेरी लावली़ कोतूळ येथे ३२ मिलीमिटर पावसाची नोंद झाली़ मुळा धरण भरण्यासाठी जोरदार पावसाची अपेक्षा आहे़ मुळा धरणाच्या मो-यातून पाणी कधी सुटणार याबाबत शेतक-यांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे़