नगर तालुक्यात निवडणुकीच्या वादातून निंबोडीत दोन गटात राडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2018 17:48 IST2018-05-19T17:44:43+5:302018-05-19T17:48:09+5:30
नगर तालुक्यातील निंबोडी येथे निवडणुकीच्या वादातून दोन गटात राडा झाला. गुरुवारी १७ मे रोजी रात्री ८ वाजेच्या सुमारास ही घटना घडली.

नगर तालुक्यात निवडणुकीच्या वादातून निंबोडीत दोन गटात राडा
अहमदनगर: नगर तालुक्यातील निंबोडी येथे निवडणुकीच्या वादातून दोन गटात राडा झाला. गुरुवारी १७ मे रोजी रात्री ८ वाजेच्या सुमारास ही घटना घडली. याप्रकरणी भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात परस्परविरोधी दाखल झालेल्या फिर्यादीत आठ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी दीपक केरू ससाणे (वय ३२) यांनी दिलेल्या फिर्यादीत निवडणुकीच्या वादातून चौघा जणांनी विटा व लाथाबुक्यांनी मारहाण केल्याचे म्हटले आहे. पोलीसांनी श्रीपाद शिवाजी शेंडगे, खंडू श्रीपाद शेंडगे, पांडू श्रीपाद शेंडगे, संतोष श्रीपाद शेंडगे यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. या घटनेप्रकरणी दुसरी फिर्याद पांडुरंग श्रीपाद शेंडगे यांनी फिर्याद दाखल केली आहे. यामध्ये पोलीसांनी राहुल दगडू शेंडगे, सुरेश मारूती शेंडगे, विवेक रविंद्र थोरात, व दीपक केरून ससाणे यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.