परदेशात नोकरी करणाऱ्यांना मुली पुरविणारे रॅकेट

By Admin | Updated: June 24, 2014 00:06 IST2014-06-23T23:52:02+5:302014-06-24T00:06:19+5:30

अहमदनगर : परदेशात नोकरी करणारे भारतात आले की त्यांना भारतात वास्तव्य असेपर्यंत मुली पुरविणारे एक मोठे रॅकेट असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.

Racket providing girls to foreign workers | परदेशात नोकरी करणाऱ्यांना मुली पुरविणारे रॅकेट

परदेशात नोकरी करणाऱ्यांना मुली पुरविणारे रॅकेट

अहमदनगर : परदेशात नोकरी करणारे भारतात आले की त्यांना भारतात वास्तव्य असेपर्यंत मुली पुरविणारे एक मोठे रॅकेट असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. अशाच एका प्रकरणात परदेशात राहणाऱ्या एका तरुणाने नगरच्या एका महिलेशी लग्न करून फसवणूक केल्याचे उघड झाले आहे. या प्रकरणात पोलिसांनीच न्यायालयासमोर वरील संशय व्यक्त केला आहे. दरम्यान अविवाहित असल्याचे भासवून तसेच हुंड्यासाठी छळ करणाऱ्या तरुणासह माजी कस्टम अधिकाऱ्याला जिल्हा न्यायालयाने २६ जूनपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.
दुष्यंत हरिश्चंद्र मते हा अमेरिकेत नोकरी करीत आहे. त्याने अविवाहित असल्याचे भासवून एका तरुणीशी विवाह केला होता. मात्र दुष्यंत याचे आधीच लग्न झाले असून आपली फसवणूक झाल्याचे निदर्शनास आल्यानंतर सोनाली दुष्यंत मते (वय २७, रा. डॉक्टर कॉलनी, बुरुडगाव रोड, नगर) यांनी पोलिसांत फिर्याद दिली. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार कोतवाली पोलिसांनी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. दुष्यंत हरिश्चंद्र मते (वय ३४, रा. डॉक्टर कॉलनी, बुरुडगाव रोड, पती), हरिश्चंद्र कृष्णाजी मते (वय ६४, सासरा) आणि नकुल हरिश्चंद्र मते (दीर) अशी आरोपींची
नावे आहेत. फसवणुक आणि हुंडाबळी प्रकरणी हे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्यानंतर पती आणि सासरा यांना कोतवाली पोलिसांनी रविवारी अटक केली. दीर असलेला तिसरा आरोपी फरार आहे. पोलीस उपनिरीक्षक विशाल सणस यांनी या प्रकरणाचा सखोल तपास केला असता त्यामध्ये काही बाबी गंभीर असल्याचे आढळून आले. आरोपींना सोमवारी दुपारी जिल्हा न्यायालयात हजर करण्यात आले होते. अविवाहित असल्याचे भासवून मुलींशी लग्न करणे, पुन्हा परदेशात निघून जाणे, मुलींची फसवणूक करण्याचा गुन्हा हा गंभीर असून यामागे मोठे रॅकेट कार्यरत असण्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला. त्यामुळे या प्रकरणाच्या सखोल तपासासाठी आरोपींना सात दिवसांची पोलीस कोठडी देण्याची मागणी पोलिसांनी न्यायालयाकडे केली. प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी एम. एस. तोडकर यांनी दोन्ही आरोपींना २६ जूनपर्यंत म्हणजे पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. सरकारी अभियोक्ता अ‍ॅड. सचिन सुर्यवंशी यांनी भक्कमपणे युक्तीवाद करून प्रकरणाचे गांभीर्य न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले.
 
संशयास्पद घटना
दुष्यंत याचे इतर महिलांशी संबंध असण्याची शक्यता आहे. त्याने अमेरिकेत खरेच लग्न केले आहे का, याचाही तपास पोलिसांना करायचा आहे. त्याने कोणाकोणाशी संभाषण केले, याबाबतचे मोबाईल रेकॉर्ड, सोनाली हिच्या गळ््यातील सोन्याचा पोहेहार दुष्यंत याने घेतला आहे. तो पोलिसांना जप्त करायचा आहे. दुष्यंत याने ई-मेलद्वारे कोणाकोणाशी संपर्क साधले, तसेच अमेरिकास्थित एका महिलेशी दुष्यंत याने वारंवार चॅटिंग केल्याचे पोलिसांना आढळून आले आहे. नक्की ही महिला कोण, तिचे किती वेळा चॅटिंग झाले. तिचा आणि दुष्यंत यांचे नेमके कोणते संबंध आहेत, याबाबत पोलिसांनी संशय व्यक्त केला आहे. दुष्यंत परदेशात गेल्याचे पुरावे गोळा करीत आहेत. या सर्व कारणांचा तपास करणे पोलिसांना आव्हान ठरणार आहे.
सोनालीचा छळ
सोनाली हिचा २७ एप्रिल २०१३ रोजी दुष्यंत याच्याशी विवाह झाला. पंधरा दिवस त्याने चांगले वागविले. त्यानंतर सोनालीचा घरात छळ सुरू झाला. अमेरिकेत जाण्यासाठी माहेराहुन दोन लाख रुपये आणावेत, अशी मागणी दुष्यंत याने पत्नी सोनालीकडे वारंवार केली. पैसे दिले नाहीत म्हणून सोनाली हिला पतीने मारहाण, शिविगाळ, दमदाटी, जिवे मारण्याची धमकी दिली. मानसिक व शारीरिक छळ केल्यामुळे त्रस्त झालेल्या सोनालीने अखेर पोलिसांकडे धाव घेतली.

Web Title: Racket providing girls to foreign workers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.