विनयभंग करून जातिवाचक शिवीगाळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2021 04:20 IST2021-04-17T04:20:10+5:302021-04-17T04:20:10+5:30

पीडिता व पती यांचा गुरुवझाप शिवारात २० गुंठे शेतीचा प्लॉट आहे. हा प्लॉट येणे करावयाच्या असल्याने नवलेवाडी येथील जनार्धन ...

Racist insults by molestation | विनयभंग करून जातिवाचक शिवीगाळ

विनयभंग करून जातिवाचक शिवीगाळ

पीडिता व पती यांचा गुरुवझाप शिवारात २० गुंठे शेतीचा प्लॉट आहे. हा प्लॉट येणे करावयाच्या असल्याने नवलेवाडी येथील जनार्धन नवलेसोबत जानेवारी २०१८ मध्ये त्यांना येणे करण्यापोटी एक लाख रुपये देऊन त्यांच्याकडून पैसे दिल्याची तशी पावती लिहून घेतली होती. परंतु एक वर्षापर्यंत हा प्लॉट येणे करून दिला नाही. विचारणा केली असता पीडितेस उडवाउडवीची उत्तरे देऊन आरोपी वाद घालत होता. याप्रकरणी अकोले पोलीस स्टेशनमध्ये तक्रार केली होती. आरोपी कायमच उडवाउडवीची उत्तरे देत होती. पीडितेशी जवळीक करण्याचा व बोलण्याचा प्रयत्न करत असे. पीडिता व पती पैसे मागण्यासाठी गेले असता आरोपीने लज्जा उत्पन्न होईल, असे वर्तन केले. पीडितेला हाताला धरून ओढाताण करू लागला. तेव्हा पीडितेचे अपंग असलेले पती अपंग सोडविण्यासाठी मध्ये आले असता त्यांनाही आरोपीने जातिवाचक शिवीगाळ करून मारहाण केली, असे फिर्यादित म्हटले आहे.

फिर्यादीवरून अकोले पोलिसांनी आरोपी जनार्धन कमलाकर नवले याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीस अटक केली असून संगमनेर न्यायालयासमोर उभे केले असता त्याला २८ तारखेपर्यंत न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस उपविभागीय अधिकारी राहुल मदने, पोलीस निरीक्षक अभय परमार करीत आहेत.

Web Title: Racist insults by molestation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.