श्रीरामपुरात रात्रीपासूनच लसीकरणासाठी रांगा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2021 04:21 IST2021-05-18T04:21:45+5:302021-05-18T04:21:45+5:30
श्रीरामपूर : ग्रामीण रुग्णालयाच्यावतीने रविवारी शहरातील ४५ वर्षांपुढील नागरिकांना आगाशे सभागृहातील केंद्रावर कोरोना प्रतिबंधक लसीचा दुसरा डोस देण्यात आला. ...

श्रीरामपुरात रात्रीपासूनच लसीकरणासाठी रांगा
श्रीरामपूर : ग्रामीण रुग्णालयाच्यावतीने रविवारी शहरातील ४५ वर्षांपुढील नागरिकांना आगाशे सभागृहातील केंद्रावर कोरोना प्रतिबंधक लसीचा दुसरा डोस देण्यात आला. मात्र, त्यासाठी शनिवारी रात्रीपासूनच रांग लागली होती. यावेळी काहीजण मुक्कामी आले होते. मात्र, तरीही केवळ दीडशे डोस आल्यामुळे अनेकांना लस न घेताच परत जावे लागले.
लसीकरण केंद्रावर सकाळी ११च्या सुमारास डोस संपल्याचे सांगण्यात आले. यामुळे केंद्रावर गोंधळ उडाला व लसीकरण केंद्रप्रमुख व नागरिकांमध्ये वाद सुरु झाले. एका उद्योगामधील कामगारांना रांग सोडून मध्येच लसीकरण केल्यामुळे डोस संपले. उर्वरित टोकन मिळालेल्या नागरिकांची मात्र निराशा झाली. लसीकरण केंद्रावर झालेल्या गोंधळानंतर तहसीलदार प्रशांत पाटील यांनी भेट दिली असता, अनेक नागरिकांनी तक्रारी केल्या. डोस संपल्यामुळे डोस देणे शक्य नाही. दुसऱ्या दिवशी रांगेत डोस दिले जातील, असे त्यांनी स्पष्ट केले.