मनपाच्या माहिती सुविधा केंद्राबाहेर नागरिकांच्या रांगा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2021 04:22 IST2021-05-19T04:22:00+5:302021-05-19T04:22:00+5:30

अहमदनगर : महापालिकेने कठोर निर्बंध लागू केलेले असतानाच मंगळवारी जुन्या मनपा कार्यालयासमोरील माहिती सुविधा केंद्राबाहेर नागरिकांनी एकच गर्दी केली ...

Queues of citizens outside the Corporation's Information Facilitation Center | मनपाच्या माहिती सुविधा केंद्राबाहेर नागरिकांच्या रांगा

मनपाच्या माहिती सुविधा केंद्राबाहेर नागरिकांच्या रांगा

अहमदनगर : महापालिकेने कठोर निर्बंध लागू केलेले असतानाच मंगळवारी जुन्या मनपा कार्यालयासमोरील माहिती सुविधा केंद्राबाहेर नागरिकांनी एकच गर्दी केली होती. महापालिकेच्या कार्यालयाबाहेर अशी गर्दी झाल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

महापालिकेकडून कोरोनाची साखळी तोडण्यासाठी विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. रस्त्यावर विनाकारण फिरणाऱ्यांची चाचणी करण्यात येत आहे. मात्र महापालिकेच्या माहिती सुविधा केंद्रासमोरच लांबच लांब रांगा लागल्या आहेत. नागरिकांची गर्दी होऊ नये यासाठी महापालिकेकडून कुठल्याही उपाययोजना केल्या गेल्या नाहीत. हे केंद्र काही दिवसांपासून बंद होते. नागरिकांना जन्म - मृत्यूच्या दाखल्यांची गरज आहे. हे दाखले घेण्यासाठी नागरिकांनी माहिती सुविधा केंद्राबाहेर गर्दी केली होती. नियमांचे पालन न करता नागरिक गर्दी करत असून, याकडे महापालिका प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. या गर्दीतून कोरोनाचा संसर्ग वाढण्याची भीती परिसरातील नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.

Web Title: Queues of citizens outside the Corporation's Information Facilitation Center