राजमाता जिजाऊ न्याय प्रगल्भ आदर्शवत माता होत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2021 04:25 IST2021-01-16T04:25:03+5:302021-01-16T04:25:03+5:30
जिल्हा कौटुंबिक न्यायालय येथे शुक्रवारी अहमदनगर शहर बार असोसिएशन, माहेर फाउंडेशन, नेहरू युवा केंद्र, जिल्हा क्रीडा कार्यालय, महानगरपालिका, जय ...

राजमाता जिजाऊ न्याय प्रगल्भ आदर्शवत माता होत्या
जिल्हा कौटुंबिक न्यायालय येथे शुक्रवारी अहमदनगर शहर बार असोसिएशन, माहेर फाउंडेशन, नेहरू युवा केंद्र, जिल्हा क्रीडा कार्यालय, महानगरपालिका, जय असोसिएशन ऑफ एनजीओ (महाराष्ट्र राज्य) यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय युवा सप्ताहातंर्गत स्वच्छता अभियान राबवून महिला सक्षमीकरणावर व्याख्यान घेण्यात आले. यावेळी कंक बोलत होत्या. कार्यक्रमाला बार असोसिएशनचे अध्यक्ष अॅड. भूषण बऱ्हाटे, अॅड. भानुदास होले, रजनी ताठे, अॅड. महेश शिंदे, अॅड. श्याम आसावा, अॅड. लक्ष्मण कचरे, अॅड. शिवाजी कराळे, अमोल बागुल, शाहीर कान्हू सुंबे, सागर अलचेट्टी, अॅड. अनिता दिघे आदी उपस्थित होते.
कंक म्हणाल्या, महिला मुळातच सक्षम आहेत. महिलांनी खंबीरपणे स्वत:च्या कर्तृत्वाने सर्व क्षेत्रात भरारी घेतली आहे. कोरोना महामारीने स्वच्छतेचे महत्त्व पटवून दिले आहे. निरोगी आरोग्यासाठी अंतरिक व बाह्य स्वच्छता महत्त्वाची असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी कौटुंबिक न्यायालयात स्वच्छता अभियान राबविण्यात आले. यावेळी अॅड. भूषण बऱ्हाटे यांनी मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन अॅड. अनिता दिघे यांनी केले. आभार सुनील तोडकर यांनी मानले.
फोटो १५ अभियान
ओळी- जिल्हा कौटुंबिक न्यायालयात राष्ट्रीय युवा सप्ताहानिमित्त स्वच्छता अभियान राबविण्यात आले.