शहरं
Join us  
Trending Stories
1
अरबी समुद्रात 'शक्ती' चक्रीवादळ घोंगावलं, हवामान खात्याचा इशारा; महाराष्ट्राला कितपत बसणार फटका?
2
...म्हणून अजित पवारांनी त्या गोष्टीचा फायदा उचलला; गृहराज्यमंत्री योगेश कदम : आदित्यला मंत्रिपद ही चूक
3
महायुतीत संघर्ष पेटला! गणेश नाईकांचे 'ते' व्हिडिओ महाराष्ट्रात प्रदर्शित करू; शिंदेसेनेचा इशारा
4
पुढच्या वर्षी मेगा सरकारी नोकरभरती, एमपीएससी भरतीही रेंगाळणार नाही; फडणवीस यांची घोषणा
5
मोठी बातमी! दिवाळीच्या ताेंडावर वीज दरवाढीचा 'बॉम्ब'; प्रति युनिट ३५ ते ९५ पैशांपर्यंत बिल वाढणार
6
फरहान अख्तरच्या ड्रायव्हरने ३५ लिटर क्षमतेच्या टाकीत ६२१ लिटर इंधन भरले; बिल दिले अन्...
7
आजचे राशीभविष्य- ५ ऑक्टोबर २०२५: शुभ फलदायी दिवस, नवीन कार्यारंभ यशस्वीपणे करू शकाल
8
शेतकऱ्यांना पावसाचा, नाेकरदारांना महागाईचा फटका; दिवाळीपूर्वी काय काय होऊ शकते...
9
कोजागरी पौर्णिमा केव्हा साजरी करायची? यंदा मध्यरात्रीच आली, पंचांगकर्ते दा. कृ. सोमण म्हणाले...
10
पैसेच नव्हते, मग दुसऱ्याच्या तुटलेल्या बॅटने खेळलो, जिंकलोही; तिलक वर्माने सांगितला आपला प्रवास
11
सगळे काही मराठा समाजालाच का? ओबीसी नेत्यांचा सवाल, मोर्चावर ठाम
12
आज हायव्होल्टेज लढत! भारत-पाकिस्तान महिला संघ आज भिडणार, हस्तांदोलन करणार? 
13
राज-उद्धव एकत्र आल्याने काही फरक पडणार नाही : गृहराज्यमंत्री योगेश कदम
14
रोहित शर्माची उचलबांगडी, ऑस्ट्रेलिया दौऱ्यात शुभमन गिलकडे नेतृत्व; विराटसह संघात ठेवले हेच...
15
‘त्या’ कफ सिरपच्या नमुन्यांत भेसळ; उत्पादन, विक्री थांबवण्याचे आदेश
16
पाकव्याप्त काश्मीरमध्ये आंदोलन, शरीफ नरमले; आंदोलन मागेही घेतले
17
५० हजारांना मुलीची खरेदी; जबरीने लग्न
18
ईएमआय की एसआयपी? तुम्हाला कोण करेल श्रीमंत?
19
परीक्षेचा अटॅक: ताण, चिंता इतकी वाढते की ज्यामुळे अभ्यासात लक्ष लागत नाही
20
भाई, बाळासाहेबांबद्दल नेमके काय झाले होते, सांगता का..?

५० हजारांना मुलीची खरेदी; जबरीने लग्न

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 5, 2025 06:40 IST

श्रमजीवी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी या प्रकरणाला वाचा फोडली. अहिल्यानगर जिल्ह्याच्या संगमनेर तालुक्यातील तरुणाशी मुलीचे जबरदस्तीने लग्न लावून देण्यात आले.

लोकमत न्यूज नेटवर्क कुडूस : आदिवासी समाजातील १४ वर्षीय मुलीच्या कुटुंबीयांना दलालामार्फत ५० हजार रुपये देऊन तिच्याशी जबरदस्तीने लग्न केल्याचा अमानुष प्रकार वाडा तालुक्यात उघडकीस आला आहे. याप्रकरणी वाडा पोलिस ठाण्यात मुलीच्या पतीसह सहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर मध्यस्थी करणारा आरोपी रवी कृष्णा कोर याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

श्रमजीवी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी या प्रकरणाला वाचा फोडली. अहिल्यानगर जिल्ह्याच्या संगमनेर तालुक्यातील तरुणाशी मुलीचे जबरदस्तीने लग्न लावून देण्यात आले. लग्नासाठी तिच्या कुटुंबीयांना धमकावण्यात आले. लग्नासाठी केलेल्या व्यवहारातील ५० हजार रुपये मुलीचे काही कुटुंबीय आणि दलालाने घेतले. २०२३ मध्ये ती गर्भवती राहिल्यानंतर पती आणि सासरच्या मंडळींनी तिचा शारीरिक आणि मानसिक छळ सुरू केला. तिला मुलगी झाल्यानंतर तर छळाची तीव्रता आणखी वाढली, असे पोलिसांत केलेल्या तक्रारीत म्हटले आहे.

मुलीचे वडील हयात नाहीत. आई हयात आहे, मात्र मुलगी काकीकडे राहत होती. तिची काकी वयोवृद्ध आहे. तिच्या नकळत हा व्यवहार करण्यात आला होता, अशी माहिती महाराष्ट्र श्रमजीवी संघटनेचे चिटणीस विजय जाधव यांनी दिली.

आधार कार्डमध्ये फेरफारपीडिता गर्भवती राहिल्यानंतर नोंदणी करण्यासाठी बनावट आधार कार्ड तयार करून जन्मतारीख बदलली. मूळ जन्मतारीख १० ऑक्टोबर २००८ असताना तिच्या पतीने ती २० ऑक्टोबर २००३ अशी दाखवल्याचे तक्रारीत म्हटले आहे. आरोपी कोण? : आरोपींमध्ये तिचा पती जीवन बाळासाहेब गाडे, चुलत सासरा अमोल गाडे, सासरा बाळासाहेब गाडे, दोन चुलत सासवा व एक नातेवाईक महिला यांचा समावेश आहे. आणखी चार मुलींची विक्री? : वाडा तालुक्यातील कातकरी समाजातील आणखी चार मुलींची एक-सव्वा लाख रुपयांच्या बदल्यात विक्री करून त्यांचे लग्न लावून देण्यात आले आहे, अशी माहिती श्रमजीवी संघटनेने दिली. दलालांवर तत्काळ गुन्हे दाखल करावेत; अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा संघटनेचे जिल्हाध्यक्ष सुरेश रेंजड यांनी दिला.  

English
हिंदी सारांश
Web Title : Girl bought for 50,000 rupees, forced marriage in Wada.

Web Summary : A 14-year-old tribal girl was forcibly married after her family received ₹50,000. Police arrested a mediator and filed charges against six others for the abuse and forced marriage, which involved falsifying documents. Four more girls may have been sold for marriage.
टॅग्स :marriageलग्न