५० जणांवर दंडात्मक कारवाई
By | Updated: December 5, 2020 04:37 IST2020-12-05T04:37:05+5:302020-12-05T04:37:05+5:30
कोपरगाव : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता विनामास्क फिरणाऱ्या व्यक्तीवर पोलिसांनी कारवाईचा बडगा उचलला आहे. त्यानुसार कोपरगाव तालुक्यातील ग्रामीण ...

५० जणांवर दंडात्मक कारवाई
कोपरगाव : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता विनामास्क फिरणाऱ्या व्यक्तीवर पोलिसांनी कारवाईचा बडगा उचलला आहे. त्यानुसार कोपरगाव तालुक्यातील ग्रामीण भागात तालुका पोलिसांनी गुरुवारी (दि.३ डिसेंबर) ५० व्यक्तीवर दंडात्मक कारवाई केली आहे. यामध्ये विनामास्क फिरणारे ४६, फिजिकल डिस्टन्सिंग न पाळणारे ४ अशा एकूण ५० व्यक्तींवर दंडात्मक कारवाई करून सुमारे ५ हजार रुपये दंडाची वसुली केली आहे. सदरची कारवाई कोपरगाव तालुका पोलीस ठाण्याचे निरीक्षक दौलत जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल आबासाहेब वाखुरे व त्यांच्या सहकाऱ्यांनी ही कारवाई केली आहे.