जैन मुनींच्या मारेकऱ्यांना कठोर शिक्षा करा, संतप्त जैन समाजाची मागणी

By शिवाजी पवार | Updated: July 17, 2023 16:46 IST2023-07-17T16:45:16+5:302023-07-17T16:46:15+5:30

जैन मुनींच्या शरीराचे तुकडे करून ते बोअरवेलमध्ये टाकण्यात आले होते. या घटनेविरूद्ध श्रीरामपुरात तीव्र संताप उमटला.

Punish the killers of Jain sages severely, demands of angry Jain community | जैन मुनींच्या मारेकऱ्यांना कठोर शिक्षा करा, संतप्त जैन समाजाची मागणी

जैन मुनींच्या मारेकऱ्यांना कठोर शिक्षा करा, संतप्त जैन समाजाची मागणी

श्रीरामपूर : बेळगाव जिल्ह्यातील चिकुडी येथे जैन मुनी कामकुमार मुनीराज यांच्या निर्घुण हत्येच्या घटनेचा येथील जैन समाजाच्या वतीने निषेध करण्यात आला. शहरात रस्त्यावर उतरून आरोपींवर कठोर कारवाईची मागणी यावेळी करण्यात आली. 

जैन मुनींच्या शरीराचे तुकडे करून ते बोअरवेलमध्ये टाकण्यात आले होते. या घटनेविरूद्ध श्रीरामपुरात तीव्र संताप उमटला. शहरात फेरी काढत आरोपींवर कारवाईची मागणी करण्यात आली. यानंतर प्रांताधिकार्यांना पार्श्वनाथ दिगंबर जैन मंदिराच्या वतीने निवेदन देण्यात आले.

स्थानकवासी जैन श्रावक संघाचे अध्यक्ष रमेश लोढा, संभवनाथ जैन श्वेतांबर मृत्यूपुजक संघाचे विश्वस्त शैलेश बाबरिया, दिगंबर जैन समाजाचे अध्यक्ष संजय कासलीवाल यांच्या निवेदनावर स्वाक्षर्या आहेत.

राम मंदिर चौकात घेण्यात आलेल्या शोकसभेत घटनेबद्दल दु:ख व्यक्त करण्यात आले. यावेळी जैन मुनी तसेच समजाचे प्रमुख उपस्थित होते. उपस्थितांमध्ये महिलांची संख्या मोठी होती.

Web Title: Punish the killers of Jain sages severely, demands of angry Jain community