कोपरगाव शहरातील शास्ती माफी करावी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:40 IST2021-02-05T06:40:20+5:302021-02-05T06:40:20+5:30
कोपरगाव : कोरोनामुळे होरपळलेल्या जनतेला एक दिलासा म्हणून यावर्षीची कोपरगावच्या जनतेची घरपट्टी, नळपट्टी माफ करण्यात यावी, अशी ...

कोपरगाव शहरातील शास्ती माफी करावी
कोपरगाव : कोरोनामुळे होरपळलेल्या जनतेला एक दिलासा म्हणून यावर्षीची कोपरगावच्या जनतेची घरपट्टी, नळपट्टी माफ करण्यात यावी, अशी मागणी कोपरगाव येथील सामाजिक कार्यकर्ते राजेश मंटाला यांनी मुख्याधिकारी प्रशांत सरोदे यांना शुक्रवारी (दि. २९) निवेदनातून केली आहे.
निवेदनात म्हटले, कोपरगाव नगर परिषद शहरवासीयांना ५० ते ६० दिवसच पाणी मिळते. त्यामुळे जर घरपट्टी रद्द करणे शक्य नसेल तर अहमदनगर महापालिकेने ज्याप्रमाणे शास्ती माफीची योजना राबविली होती. त्याचप्रमाणे कोपरगाव शहरातील तमाम करदात्यांच्या थकीत करावरील शास्ती माफ करण्यात यावी. कोरोनामुळे व्यापार धंद्यावर फार विपरीत परिणाम झालेला आहे. या अगोदरही या विषयाच्या संदर्भात मुख्यमंत्री, जिल्हाधिकारी, मुख्याधिकारी यांना ई-मेलद्वारे निवेदन दिलेले आहे. त्यामुळे आपण याविषयी सहानुभूतीपूर्वक विचार करावा असेही म्हटले आहे.
२९ निवेदन