संघर्ष गाथेचे प्रकाशन, शरद पवार उद्या नगरमध्ये
By अण्णा नवथर | Updated: May 20, 2023 16:49 IST2023-05-20T16:48:48+5:302023-05-20T16:49:02+5:30
नगर जिल्हा हमाल पंचायतचे विद्यमान अध्यक्ष अविनाश घुले यांच्या संकल्पनेतून या ग्रंथाची निर्मिती करण्यात आली आहे.

संघर्ष गाथेचे प्रकाशन, शरद पवार उद्या नगरमध्ये
अहमदनगर: येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रांगणात रविवारी (दि. २१) होत असलेल्या राज्य हमाल मापाडी महामंडळाच्या २१ व्या राष्ट्रीय अधिवेशनाचे उद्घाटन राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी जिल्हा हमाल पंचायतीचे संस्थापक अध्यक्ष माजी नगराध्यक्ष लोकनेते स्व. शंकरराव घुले यांच्या जीवनकार्याचा हृदयस्पर्शी वेध घेणाऱ्या ग्रंथाचे प्रकाशन राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.
नगर जिल्हा हमाल पंचायतचे विद्यमान अध्यक्ष अविनाश घुले यांच्या संकल्पनेतून या ग्रंथाची निर्मिती करण्यात आली आहे. नगर शहराच्या पुढील वाटचालीत नव्या पिढीला मोलाचे मार्गदर्शन करणारा हा संदर्भ ग्रंथ ठरणार आहे, अशी माहिती घुले यांनी दिली आहे.