शेतकऱ्यांना २५ हजारांची अर्थिक मदत द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2021 04:20 IST2021-03-24T04:20:02+5:302021-03-24T04:20:02+5:30
अहमदनगर : जिल्ह्यात अतिवृष्टी व गारपिटीमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, पिकांसाठी प्रति हेक्टरी २५, तर फळबागांसाठी ५० ...

शेतकऱ्यांना २५ हजारांची अर्थिक मदत द्या
अहमदनगर : जिल्ह्यात अतिवृष्टी व गारपिटीमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, पिकांसाठी प्रति हेक्टरी २५, तर फळबागांसाठी ५० हजारांची अर्थिक मदत देण्यात यावी, अशी मागणी भाजपाचे जिल्हाध्यक्ष अरुण मुंढे यांनी निवेदनाद्वारे केली.
भाजपाचे जिल्हाध्यक्ष मुंढे यांनी निवासी उपजिल्हाधिकारी संदीप निचित यांची भेट घेऊन निवेदन दिले. यावेळी माजी आमदार शिवाजी कर्डिले, प्रसाद ढोकरीकर, कचरू चोथे, बाळासाहेब महाडिक, दिलीप भालसिंग, आजिनाथ हजारे, शाम पिपळे आदी उपस्थित होते. निवेदनात म्हटले आहे, मागील वर्षीच्या अतिवृष्टीतून शेतकरी सावरत असताना गारपिटीमुळे शेतकरी हवालदिल झाला. यामध्ये गहू, हरभरा, कांदा, मका, ऊस, टरबूज, खरबूज, आंबा, संत्री ,द्राक्षे, मोसंबी, चिंच आदी फळबागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. पिकांचे पंचनामे करून तातडीने मदत करावी. मागील वर्षीची मदत शेतकऱ्यांना अद्याप मिळालेली नाही. येत्या आठ दिवसांत शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देण्यात यावी, अन्यथा भाजपच्या वतीने रास्तारोको आंदोलन करण्यात येईल, असा इशारा मुंढे यांनी दिला आहे.
....
कर्डिले यांची सरकारवर टीका
राज्यात अवकाळी पाऊस होऊन तीन-चार दिवस झाले तरी सरकारने पंचनामे करण्याचे आदेश दिले नाहीत. सरकारचे सर्व लक्ष संजय राठोड, अनिल देशमुख, वाझे या प्रकारणाकडे असून, त्यासाठी बैठकांचे सत्र सुरू असल्याची टीका माजी आमदार कर्डिले यांनी केली.