शेवगावमध्ये नोंदविला ‘महावितरणा’चा निषेध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 04:38 IST2021-02-06T04:38:15+5:302021-02-06T04:38:15+5:30
शेवगाव : ‘महावितरण’ने सक्तीने वीज बिल वसुली सुरू केली आहे. शेतकऱ्याचे विद्युत कनेक्शन तोडणे, डीपी बंद करणे ...

शेवगावमध्ये नोंदविला ‘महावितरणा’चा निषेध
शेवगाव : ‘महावितरण’ने सक्तीने वीज बिल वसुली सुरू केली आहे. शेतकऱ्याचे विद्युत कनेक्शन तोडणे, डीपी बंद करणे असे प्रकार सुरू आहेत. हा प्रकार निंदनीय असून याचा आम्ही निषेध करतो, असे म्हणत भाजपच्या वतीने शेवगाव येथे ‘महावितरण’च्या अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.
महावितरणचे उपकार्यकारी अभियंता अतुल लोहारे यांनी निवेदन स्वीकारले. यावेळी किसान मोर्चा प्रदेश सदस्य बापूसाहेब पाटेकर, किसान मोर्चा जिल्हाध्यक्ष कचरू चोथे, युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष उमेश भालसिंग, माजी जिल्हा परिषद सदस्य बाळासाहेब सोनवणे, सरचिटणीस भीमराज सागडे, नवनाथ कवडे संदीप वाणी, युवा मोर्चा तालुका अध्यक्ष सचिन वारकड, किसान मोर्चा तालुका अध्यक्ष सरपंच बाबासाहेब गोर्डे, नगरपरिषदेचे उपाध्यक्ष वजीर पठाण, नगरसेवक गणेश कोरडे, कमलेश गांधी, सागर फडके, महेश फलके, विनोद मोहिते, नितीन दहिवळकर, दिगंबर काथवटे, अंकुश कुसळकर, गंगाभाऊ खेडकर, राहुल बंब, सूरज लांडे, राजाभाऊ लड्डा, अमोल सागडे, नितीन फुंदे, एकनाथ खोसे, मंगेश पाखरे, किरण काथवटे, बाळासाहेब झिरपे, अशोक झिरपे, अप्पासाहेब झिरपे आदी उपस्थित होते.
फोटो : ०५ शेवगाव बीजेपी
शेवगाव येथील महावितरण कार्यालयात भाजपच्यावतीने निवेदन देण्यात आले.