कृषी विभागाबात केलेल्या चुकीच्या व्यक्तव्याचा निषेध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2021 04:24 IST2021-03-01T04:24:05+5:302021-03-01T04:24:05+5:30
याप्रसंगी संघटनेचे राज्य कार्याध्यक्ष सोमनाथ बाचकर, जिल्हाध्यक्ष दत्तात्रय रोहोकले, नारायण घुले, सुरेश घोलप, नीलेश बिबवे, पांडुरंग जाधव, अप्पासाहेब गट ...

कृषी विभागाबात केलेल्या चुकीच्या व्यक्तव्याचा निषेध
याप्रसंगी संघटनेचे राज्य कार्याध्यक्ष सोमनाथ बाचकर, जिल्हाध्यक्ष दत्तात्रय रोहोकले, नारायण घुले, सुरेश घोलप, नीलेश बिबवे, पांडुरंग जाधव, अप्पासाहेब गट आदी उपस्थित होते. या निवेदनात म्हटले आहे की, ठाकरे यांनी कृषी विभागाचे योगदान नाकारून कृषी अधिकाऱ्यांचा कोणत्याही योजनेत इंटरेस्ट नसतो. ते फक्त बैठकीला उपस्थित राहतात. कृषी विभागाच्या कार्यक्षमतेवरच त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
कृषी सेवकाला या योजनेची माहिती, निकष, वेबसाईट सांगता येत नसल्याचा आरोप करून ठाकरे यांनी राज्यातील कृषी सहाय्यकांच्या भावना दुखावल्या आहेत. याचा कृषी सहाय्यक संघटनेच्या वतीने राज्यभर निषेध करण्यात येत आहे.
प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेत ग्रामस्तरावर कृषी सहाय्यक, तलाठी, ग्रामसेवक यांच्याकडे कामकाज सोपविले होते. ते कामकाज पूर्ण झाले आहे. तिन्ही विभागांच्या ग्रामस्तरीय कर्मचाऱ्यांनी सम प्रमाणात काम केल्याचे सिद्ध होते. वस्तुस्थिती अशी असतानाही कृषी सेवकाला या योजनेची माहिती नाही असे म्हणणे चुकीचे आहे. शासनाने या प्रकरणाची दखल घेत चुकीचे वक्तव्य करणाऱ्या पदाधिकाऱ्यांना समज द्यावी, अन्यथा कृषी सहाय्यक संघटना तीव्र आंदोलन करील. असे या निवेदनात म्हटले आहे.
फोटो २८ निवेदन
ओळी- कृषी विभागाबाबत महाराष्ट्र राज्य नायब तहसीलदार संघटनेचे विभागीय अध्यक्ष प्रवीण ठाकरे यांनी चुकीच्या प्रतिक्रिया व्यक्त केल्याप्रकरणी महाराष्ट्र राज्य कृषी सहाय्यक संघटनेच्या वतीने निषेध करून जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शिवाजीराव जगताप यांना निवेदन दिले. याप्रसंगी संघटनेचे कार्यध्यक्ष सोमनाथ बाचकर, जिल्हाध्यक्ष दत्तात्रय रोहोकले, नारायण घुले, सुरेश घोलप, नीलेश बिबवे, पांडुरंग जाधव, अप्पासाहेब गट आदी.