चुलीवर भाकरी भाजून इंधन दरवाढीचा नोंदविला निषेध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 17:59 IST2021-02-06T17:58:07+5:302021-02-06T17:59:06+5:30
केंद्र सरकारने केलेल्या गॅस दरवाढीसह इंधन दरवाढीचा निषेध नोंदविण्यासाठी राष्ट्रवादीच्या वतीने शनिवारी श्रीगोंदा येथील तहसील कार्यालयासमोर चुलीवर भाकरी भाजल्या.

चुलीवर भाकरी भाजून इंधन दरवाढीचा नोंदविला निषेध
श्रीगोंदा : केंद्र सरकारने केलेल्या गॅस दरवाढीसह इंधन दरवाढीचा निषेध नोंदविण्यासाठी राष्ट्रवादीच्या वतीने शनिवारी श्रीगोंदा येथील तहसील कार्यालयासमोर चुलीवर भाकरी भाजल्या.
राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष घनश्याम शेलार व माजी आमदार राहुल जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केले. यावेळी तहसीलदार प्रदीप पवार यांना निवेदन दिले.
यावेळी नगराध्यक्षा शुभांगी पोटे व राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या तालुकाध्यक्ष मिनल भिंताडे म्हणाल्या, आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्च्या तेलाच्या किमती कमी असतानाही केंद्र सरकारने वारंवार गॅस तसेच इंधन दरवाढ केली. या माध्यमातून केंद्र सरकार सर्वसामान्य जनतेला लुटत आहे. यामुळे महागाईचा भडका उडाला असून अनेकांनी गॅस वापरणे बंद केले आहे, अशी टीका त्यांनी केली.