शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
2
OLA चे ७५ शोरूम बंद, अजून १२१ बंद करण्याच्या सूचना; RTO ची धडक कारवाई, कारण काय?
3
सीमेपलीकडील सूत्रधार अन् दहशतवाद्यांचे दोन गुप्त संवाद गुप्तचर यंत्रणांनी पकडले
4
LoCवर संघर्षाचा भडका! पाकिस्तानी सैन्याकडून रात्रभर गोळीबार, भारतीय लष्कराकडून चोख प्रत्युत्तर
5
पुण्यातील बंडगार्डन, कोंढवा, लष्कर आणि कोरेगाव पार्क परिसरात १११ 'पाकिस्तानी' वास्तव्यास
6
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
7
Today Horoscope: आज आर्थिक लाभ होतील, मैत्रिणी भेटतील; तुमची राशी काय सांगतेय?
8
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
9
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
10
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
11
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
12
आम्ही कपाळाच्या टिकल्या काढल्या, तरी मारले...; गनबोटे यांच्या पत्नी संगीता यांची आपबीती
13
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
14
तोल गेला, आईच्या हातातून निसटले बाळ; २१ व्या मजल्यावरून पडून बाळाचा मृत्यू
15
Pahalgam Attack: ‘मिनी स्वित्झर्लंड’ला इतकी मोठी गर्दी असताना एकही लष्करी जवान नव्हता
16
महाराष्ट्राची भाग्यरेषा उजळणार, ‘समृद्धी’चा अंतिम टप्पा लोकार्पणाच्या उंबरठ्यावर
17
‘आई’वर कुरघोडी करू पाहणाऱ्या ‘मावशी’चा राग; हिंदी सक्तीचा परस्पर GR काढला कुणी?
18
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
19
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
20
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण

जनतेतून नेते घडण्याची प्रक्रिया थांबली - बबनराव ढाकणे

By सुधीर लंके | Updated: March 24, 2018 13:47 IST

पाथर्डीचे पहिले आमदार व माजी मंत्री बबनराव ढाकणे यांची ‘लोकमत’ला रोखठोक मुलाखत

ठळक मुद्देनगर जिल्ह्यातील बहुतांश नेत्यांनी आपले सगेसोयरे जपत पिढ्यानपिढ्यांचे राजकारण आरक्षित केले आहे. हे नेते म्हणजे ‘बुलडोझर’सारखे आहेत.१९६७ साली काँग्रेसकडून निवडणूक लढलो व जिल्हा परिषदेत गेलो. त्या निवडणुकीत तालुक्यातून काँग्रेसमधून केवळ मी विजयी झालो होतो तर तीन कम्युनिस्ट सदस्य विजयी झाले. मी अपक्ष असताना व मला काहीही राजकीय पार्श्वभूमी नसताना त्या आपल्या गावात आल्या होत्या. १९७२ ते ७५ या काळात तालुक्यात ११० पाझर तलाव झाले.सकाळी नेहरु फिरायला बाहेर पडले तेव्हा सुरक्षारक्षकांची नजर चुकवून आपण थेट त्यांना गाठले होते. सुरक्षा रक्षकांनी आपणाला घेरले पण, नेहरुंनी माझ्याशी संवाद साधत अडचण जाणून घेतली. त्यावेळी मी अवघा चौदा वर्षांचा होतो.

अहमदनगर : आजच्या राजकारणात मूल्यांचा पुरता -हास झाला आहे. पूर्वी जनतेतून नेते घडले. आता नेते लादणे सुरु आहे. माझ्यासारख्या माणसांनी निवडणूक लढविण्याचे दिवस संपले आहेत. नगर जिल्ह्यातील बहुतांश नेत्यांनी आपले सगेसोयरे जपत पिढ्यानपिढ्यांचे राजकारण आरक्षित केले आहे. हे नेते म्हणजे ‘बुलडोझर’सारखे आहेत. त्यांनी कार्यकर्ते चिरडले. पण, जनताही आता सूज्ञ झाली आहे. जनतेतूनच भविष्यात नेते घडतील, असा आशावाद माजी मंत्री व जिल्ह्यातील ज्येष्ठ नेते बबनराव ढाकणे यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केला.पाथर्डी तालुक्याचे पहिले आमदार व दिवंगत स्वातंत्र्यसेनानी माधवराव नि-हाळी यांनी स्थापन केलेल्या एकलव्य शिक्षण संस्थेचा सुवर्णमहोत्सव व बबनराव ढाकणे यांचा नागरी सत्कार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व राष्टÑवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते पाथर्डीत होत आहे. यानिमित्त ‘लोकमत’ने ढाकणे यांच्याशी दिलखुलास संवाद साधला. या मुलाखतीत त्यांनी आपल्या राजकीय संघर्षाचा प्रवास उलगडताना नेहमीप्रमाणे आपली सडेतोड मते मांडली. आरपार बबनराव या मुलाखतीतून उलगडले.प्रश्न- आपला राजकीय प्रवास नेमका कसा सुरू झाला?ढाकणे- मला तसा काहीही राजकीय वारसा नाही. मी शेतकरी कुटुंबातला. पाथर्डी हे तालुक्याचे गाव म्हणून तेथे हिंद वसतिगृहात शिक्षणासाठी रहायचो. आठवी पास ही माझी पात्रता. नववीत तीन वर्षे घालवली व शिक्षण सोडले. नानासाहेब गोरे, सेनापती बापट, शिरुभाऊ लिमये यांच्या नेतृत्वाखाली मी गोवा मुक्ती संग्रामात उतरलो होतो. त्यामुळे काँग्रेसच्या विचारांकडे ओढलो गेलो. १९५८ साली यशवंतराव चव्हाण भगवानगडावर आले होते. त्यावेळी बाळासाहेब भारदे, नि-हाळी यांनी माझा त्यांच्याशी परिचय करुन दिला. तेव्हापासून मी काँग्रेसमध्ये सक्रिय होतो.पहिली सार्वजनिक निवडणूक कोणती?- १९६२ साली मी काँग्रेसकडून जिल्हा परिषदेची निवडणूक लढवावी अशी कार्यकर्त्यांची इच्छा होती. परंतु जिल्ह्याच्या श्रेष्ठींनी जाणीवपूर्वक निºहाळी यांची इच्छा नसताना माझे पंख छाटण्यासाठी त्यांनाही अर्ज भरायला लावला. आम्ही दोघांनीही काँग्रेसकडून अर्ज भरला. पण, पक्षाचा एबी फॉर्म नि-हाळींना मिळाला. यात राजकारण खेळले गेले. त्यामुळे मी अपक्ष लढलो व पराभूत झालो. स्वत: नि-हाळी यांनीही मला मते द्या म्हणून जनतेला आवाहन केले होते. तालुक्यात पक्षात भांडणे लावायची ही खोड काँग्रेसमध्ये तेव्हापासूनच आहे. त्यानंतर १९६७ साली काँग्रेसकडून निवडणूक लढलो व जिल्हा परिषदेत गेलो. त्या निवडणुकीत तालुक्यातून काँग्रेसमधून केवळ मी विजयी झालो होतो तर तीन कम्युनिस्ट सदस्य विजयी झाले. पण, काँग्रेसच्या श्रेष्ठींनी या सदस्यांना पक्षात घेत पदे दिली. मला दुर्लक्षित केले. त्यामुळे आपण काँग्रेसला रामराम करत अपक्षाचा रस्ता धरला. पुढे पंचायत समिती निवडणूक लढवली व अपक्ष म्हणूनच तालुक्याचा सभापतीही झालो.तुम्ही विधानसभेच्या गॅलरीतून उडी टाकण्याचा प्रयत्न केला होता.- हो. हा किताब माझ्या नावावर जमा आहे. मी १९६७ साली जिल्हा परिषदेत काम करत असताना पाथर्डी तालुक्याच्या विद्युतीकरणाचा प्रश्न होता. तालुकापातळीवर आम्ही चळवळी केल्या. पण, सरकार लक्ष देत नव्हते. त्यामुळे मी पत्रके छापून घेतली. ‘मुख्यमंत्री वसंतराव नाईक साहेब पाथर्डीला न्याय द्या’. ही पत्रके मी शर्टात लपवली व विधानसभेच्या गॅलरीत जाऊन बसलो. सभागृहात कामकाज सुरु होताच गॅलरीतून पत्रके भिरकावली व उडी मारण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी मला आसपासच्या लोकांनी पकडले. विधानसभेच्या हक्कभंगाचा ठराव त्यावेळी आपणाविरोधात करण्यात आला. मी माफी मागावी, असे सरकारने सुचविले. पण, आपण जनतेसाठी हे पाऊल उचलले असल्याने माफी मागण्यास नकार दिला. त्यामुळे मला सात दिवस आॅर्थर रोड जेलमध्ये पाठविण्यात आले. मात्र, त्यानंतर नाईक यांनी स्वत: नगरचे जिल्हाधिकारी पी. सुब्रमण्यम व मला मुंबईला बोलावून घेतले व मागण्या समजावून घेतल्या. नाईक यांनी प्रशासनाला दोन महिन्यांची मुदत देत या सर्व मागण्या सोडविण्यास सांगितले. या कामांची सुरुवात करण्यासाठी ते स्वत: पाथर्डीत आले होते. पाथर्डीच्या वसतिगृहात थांबून त्यांनी तालुक्याचा आराखडा बनविला. त्यावेळच्या राजकारण व आजच्या राजकारणातला हा सर्वात मोठा फरक आहे. माझ्या मागणीसाठी मुख्यमंत्री थेट पाथर्डीत आले होते.अपक्ष राजकारण करतानाही इंदिरा गांधींना तुम्ही पाथर्डीत कसे आणले?- त्यावेळचे राजकारण किती श्रेष्ठ होते त्याचे हे खूप मोठे उदाहरण आहे. १९७२ साली मोठा दुष्काळ पडला होता. आजवरचा हा सर्वात मोठा दुष्काळ. लोकांना धान्य नव्हते. काम नव्हते. पिण्याचे पाणी नव्हते. अशा परिस्थितीत सरकारने लोकांना रोजगार उपलब्ध करुन देण्याची गरज होती. आपण गाव तलाव, पाझर तलाव, रस्त्याची कामे मजुरांच्या मदतीने करण्याचे नियोजन केले. लोकांना पंधरा दिवसाला पगार मिळायचा. पाझर तलाव करण्यासाठी तांत्रिक लोकांची गरज होती. तेव्हा मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांनी दहावी पास मुलांना तलावांची आखणी व बांधणी कशी करायचे याचे प्रशिक्षण दिले. दहावी पास मुले दहा दिवसात अभियंते बनविण्याचे हे ऐतिहासिक उदाहरण म्हणावे लागेल. खाण्यासाठी लोकांना सुकडी वाटप केली. पाथर्डीत दुष्काळ निवारणाचे मॉडेलच उभे राहिले होते. त्यावेळी इंदिरा गांधी महाराष्टÑात दुष्काळी दौऱ्यावर येणार होत्या. राजकीय वादविवाद नको म्हणून त्यांनी मी अपक्ष सभापती असल्याने माझा तालुका निवडला. पाथर्डीतही कार्यक्रम कोठे करायचा ? हा प्रश्न होता. काहीही वाद व्हायला नको म्हणून मी माझ्या अकोला गावात स्वत:ची जागा देत तेथे पाझर तलावाचे काम केले. त्याची पाहणी इंदिरा गांधी यांनी केली. मी अपक्ष असताना व मला काहीही राजकीय पार्श्वभूमी नसताना त्या आपल्या गावात आल्या होत्या. १९७२ ते ७५ या काळात तालुक्यात ११० पाझर तलाव झाले.तुम्ही वसंतराव नाईक यांचा पाथर्डीत त्यांच्या हयातीत पुतळा उभारला. त्याचे रहस्य काय?- हो. खरे आहे हे. मी विधानसभेत आंदोलन केल्यानंतरही त्याचा राग न धरता त्यांनी पाथर्डी तालुक्यात लक्ष घातले. आपणाला हे राजकारण श्रेष्ठ वाटले. पुतळा उभारण्यास त्यांचा विरोध होता. पण, मी हट्टाला पेटलो होतो. अखेर त्यांचाही नाईलाज झाला. काही कारणास्तव १९७५ मध्ये त्यांचे मुख्यमंत्रीपद गेले व शंकरराव चव्हाण मुख्यमंत्री झाले. तेव्हा मी चव्हाण यांना पाथर्डीत आणून या पुतळ्याचे अनावरण केले. एका अपक्ष सभापतीने दोन मुख्यमंत्री व पंतप्रधान पाथर्डीत आणले होते. ज्या अधिका-यांनी दुष्काळी कामात पाथर्डीला मदत केली त्या अधिका-यांचा सुवर्णपदक देऊन मी सन्मानही केला होता.

चौदाव्या वर्षी पंडित नेहरुंच्या भेटीला

पाथर्डीत हिंद वसतिगृहात असताना एकदा अधीक्षक मला रागावले. त्यावेळी मी रागातून एस.टी. बस पकडून थेट मुंबई गाठली व रेल्वेने फुकट प्रवास करत दिल्ली गाठली. चाचा नेहरु नावाचा माणूस मुलांवर प्रेम करतो हे ऐकले होते. त्यांना भेटून अधीक्षकांची तक्रार करायची होती. दिल्लीत त्यांच्या निवासस्थानी रात्री एक वाजता पोहोचलो. त्यावेळी पोलिसांनी हटकले. मला नेहरुंना भेटायचे आहे असे सांगितल्यावर रात्रभर त्यांनी मला तेथेच झाडाजवळ मुक्काम करण्याचा सल्ला दिला. सकाळी नेहरु फिरायला बाहेर पडले तेव्हा सुरक्षारक्षकांची नजर चुकवून आपण थेट त्यांना गाठले होते. सुरक्षा रक्षकांनी आपणाला घेरले पण, नेहरुंनी माझ्याशी संवाद साधत अडचण जाणून घेतली. त्यावेळी मी अवघा चौदा वर्षांचा होतो. ‘मला शिकायचे आहे. पण अधीक्षक रागावतात’ ही तक्रार थेट पंतप्रधान म्हणून त्यांच्याकडे केली. त्यानंतर नेहरुंनी मला निवासस्थानात बोलवून घेतले व काकासाहेब गाडगीळ यांच्यामार्फत पुण्यात शिक्षणाची सोय केली. मात्र, आपण पुण्यात फारसे रमलो नाही.

टॅग्स :Babanrao Dhakaneबबनराव ढाकणेAhmednagarअहमदनगर