नवनागापूरच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2021 04:18 IST2021-03-24T04:18:40+5:302021-03-24T04:18:40+5:30
नवनागापूरमध्ये पाण्याची व्यवस्था नसल्यामुळे नागरिकांचे पिण्याच्या पाण्यासाठी प्रचंड हाल होत आहेत. राष्ट्रीय पेयजल योजनेच्या माध्यमातून पाणी योजना ...

नवनागापूरच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटणार
नवनागापूरमध्ये पाण्याची व्यवस्था नसल्यामुळे नागरिकांचे पिण्याच्या पाण्यासाठी प्रचंड हाल होत आहेत. राष्ट्रीय पेयजल योजनेच्या माध्यमातून पाणी योजना होण्यासाठी २०१५ साली प्रस्ताव दाखल केला. एमआयडीसीने गावासाठी दररोज १५ लाख लिटर व भविष्यात लागणारा वाढीव पाणी कोटा देण्याचे हमीपत्र नवनागापूर ग्रामपंचायतीला दिल्यामुळे योजना पूर्णत्वाला जाण्याचा मार्ग मोकळा झाला. योजनेस ५ सप्टेबर २०१९ रोजी तांत्रिक मान्यता प्राप्त झाली. २१ सप्टेबर २०१९ रोजी ९ कोटी ८१ लाख ६७ हजार या किमतीच्या नवनागापूर पाणी योजनेस प्रशासकीय मान्यता मिळाली.
............
४६ किलोमीटरची पाइपलाइन
योजनेत प्रास्तावित केल्यानुसार मल्हारनगर येथे ९ लाख २० हजार लिटर, दांगट मळा येथे ४ लाख ४५ हजार लिटर, आनंदनगर येथे ३ लाख ५६ हजार लिटर, मनोरमा कॉलनी येथे ३ लाख ५६ हजार लिटर क्षमतेच्या एकूण चार उंच पिण्याच्या पाण्याच्या टाक्या होणार आहेत. वितरण व्यवस्थेसाठी ४६ किलोमीटरची पाइपलाइन प्रस्तावित करण्यात आली आहे.