पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा शपथविधीच्या पार्श्वभुमीवर शिर्डीत लाडूवाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2019 17:59 IST2019-05-30T17:58:32+5:302019-05-30T17:59:00+5:30
नरेंद्र मोदी पुन्हा एकदा पंतप्रधान पदाची शपथ घेत असल्याच्या पार्श्वभुमीवर कार्यकर्ते जल्लोष साजरा करत आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा शपथविधीच्या पार्श्वभुमीवर शिर्डीत लाडूवाटप
शिर्डी : नरेंद्र मोदी पुन्हा एकदा पंतप्रधान पदाची शपथ घेत असल्याच्या पार्श्वभुमीवर कार्यकर्ते जल्लोष साजरा करत आहेत.
शिर्डीत भाजप कार्यकर्त्यांच्या वतीने आनंदोत्सव साजरा करण्यात आला. साईंच्या समाधीवर कमळाच्या फुलांचा हार अर्पण करुन कार्यकर्त्यांनी लाडू वाटप केल. भाजप युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष सचिन तांबे यांच्या पुढाकारातून अनोखा आनंदोत्सव साजरा करण्यात आला. मोदींचा जयघोष करत कार्यकर्त्यांनी भाविकांना २५ किलो लाडू वाटप केले. साई समाधी शताब्दीच्या सांगता सोहळ्यास पंतप्रधान नरेंद्र मोदींनी साईंच्या दरबारात हजेरी लावली होती. साईदर्शनाचा फ्लेक्स बनवून मोदींच्या शपथविधीचा आनंदोत्सव भाजप कार्यकर्त्यांच्या वतीने साजरा करण्यात आला.