"आम्ही विकासाचे आकडे सांगतोय, याआधी भ्रष्टाचाराचे आकडे ऐकायला मिळायचे"
By अण्णा नवथर | Updated: October 26, 2023 17:12 IST2023-10-26T17:12:05+5:302023-10-26T17:12:23+5:30
केंद्रात भाजपचे सरकार आल्यानंतर या प्रकल्पासाठी निधी देण्यात आला. हे काम आता पूर्ण झाले आहे.

"आम्ही विकासाचे आकडे सांगतोय, याआधी भ्रष्टाचाराचे आकडे ऐकायला मिळायचे"
अहमदनगर: महाराष्ट्रातील एक वरीष्ठ नेते केद्रात कृषीमंत्री होते. त्यांनी गेल्या ६० वर्षांत केंद्र सरकारच्या माध्यमातून राज्यातील शेतकऱ्यांसाठी काय केले, अशी टिका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांच्यावर नाव न घेता केली.
शिर्डी येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते साडेसातशे कोटींच्या विकास कामांचे लोकार्पण गुरुवारी करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.
ते पुढे म्हणाले, की पूर्वी देशात भ्रष्टाचाराचे आकडे ऐकायला मिळत होते. आता विकास कामांचे आकडे सांगितले जात आहे. केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या अर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी प्रयत्न करत आहे. निवळवंडे धरणाला १९७० मध्ये मंजूरी मिळाली. गेल्या पाच दशकांपासून हे काम रखडलेले होते. केंद्रात भाजपचे सरकार आल्यानंतर या प्रकल्पासाठी निधी देण्यात आला. हे काम आता पूर्ण झाले आहे. शेतकऱ्यांच्या मतांवर केवळ राजकारण केले गेले. महाराष्ट्राती एक वरीष्ठ नेते केंद्रात कृषी मंत्री होते. त्यांनी गेल्या ६० वर्षांत शेतकऱ्यांसाठी काय केले, असा सवालही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उपस्थित केला.