पोलीस असल्याची बतावणी करत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2021 04:16 IST2021-05-29T04:16:56+5:302021-05-29T04:16:56+5:30

श्रीरामपूर : श्रीरामपूर येथून नगरला भंगार घेऊन जाणाऱ्या एका ट्रक चालकाला चार जणांनी बेदम मारहाण करून त्याच्या ताब्यातील ...

Pretending to be the police | पोलीस असल्याची बतावणी करत

पोलीस असल्याची बतावणी करत

श्रीरामपूर : श्रीरामपूर येथून नगरला भंगार घेऊन जाणाऱ्या एका ट्रक चालकाला चार जणांनी बेदम मारहाण करून त्याच्या ताब्यातील ट्रक पळवून नेला. पोलीस असल्याची बतावणी करून आरोपींनी नगर मनमाड महामार्गावर हा ट्रक तत्पूर्वी थांबविला होता.

याप्रकरणी श्रीधर जंगलू सोनवणे (वय ३४, एकलहरे) यांनी राहुरी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यांच्या मालकीचा ट्रक (एमएच ४२ एम ९४८२) भंगार घेऊन चालला असता राहुरी विद्यापीठाजवळ ही घटना घडली.

एका विनाक्रमांकाच्या कारमधून आलेल्या चार अनोळखी तरुणांनी पोलीस असल्याची बतावणी करून सोनवणे यांचा ट्रक थांबविला. त्यानंतर त्यांना कारमध्ये बळजबरीने बसवून नेले. त्यातील एक आरोपी ट्रक नगरच्या दिशेने घेऊन पसार झाला. इतर आरोपींनी सोनवणे यांना मुळा धरणाच्या परिसरात वरवंडी गावाच्या शिवारात निर्जनस्थळी गाडीतून उतरून दिले. तत्पूर्वी त्यांनी शिवीगाळ करून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.

सोनवणे यांनी राहुरी पोलीस ठाण्यात येत घडलेला प्रकार पोलिसांना सांगितले. त्यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ट्रकमधील पाच लाख ६६ हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. १७०० किलोचे भंगार वाहनात होते. ट्रक कोणी व का चोरून नेला याबाबतचा तपास पोलीस करत आहेत.

-----------

Web Title: Pretending to be the police