राज्य कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष योगीराज खोंडे यांचे निधन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 6, 2017 17:16 IST2017-10-06T17:15:53+5:302017-10-06T17:16:11+5:30
राज्य कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष योगीराज खोंडे यांचे शुक्रवारी अल्पशा आजाराने निधन झाले. ते ७५ वर्षांचे होते

राज्य कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष योगीराज खोंडे यांचे निधन
लोकमत न्यूज नेटवर्क
अहमदनगर : राज्य कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष योगीराज खोंडे यांचे शुक्रवारी अल्पशा आजाराने निधन झाले. ते ७५ वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी, चार पुतणे, लहान भाऊ असा परिवार आहे. पाटबंधारे खात्यातून सन २००० मध्ये निवृत्त झालेले खोंडे यांनी गेल्या पन्नास वर्षांहून अधिक काळ राज्य कर्मचारी संघटनेची धुरा वाहिली. गेल्या १७ वर्षांपासून ते राज्य संघटनेचे अध्यक्ष म्हणून काम पाहत होते. राज्य कर्मचाºयांचे विविध प्रश्न शासनदरबारी मांडणे, त्यावर चर्चा करून ते प्रश्न सुटेपर्यंत चिकाटीने त्याचा पाठपुरावा करणे यासाठीच ते अखेरपर्यंत झिजत राहिले. त्यांच्या निधनाने राज्यातील कर्मचाºयांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे.