महाराष्ट्र पक्षिमित्र संमेलनाच्या अध्यक्षपदी प्रा. डॉ. निनाद शहा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2021 04:23 IST2021-03-09T04:23:40+5:302021-03-09T04:23:40+5:30
केडगाव : महाराष्ट्र पक्षिमित्रचे ३४ वे महाराष्ट्र पक्षिमित्र संमेलन सोलापूर येथे १० व ११ एप्रिल २०२१ या रोजी ...

महाराष्ट्र पक्षिमित्र संमेलनाच्या अध्यक्षपदी प्रा. डॉ. निनाद शहा
केडगाव : महाराष्ट्र पक्षिमित्रचे ३४ वे महाराष्ट्र पक्षिमित्र संमेलन सोलापूर येथे १० व ११ एप्रिल २०२१ या रोजी डॉ. निर्मलकुमार फडकुले सभागृह सोलापूर येथे आयोजित केले जाणार आहे. या संमेलनाच्या अध्यक्षपदी सोलापूर येथील ज्येष्ठ पक्षी अभ्यासक प्रा. डॉ. निनाद शहा यांची निवड करण्यात आली आहे.
आगामी ३४ वे संमेलन डॉ. मेतन फाउंडेशन सोलापूर तर्फे आयोजित करण्यात येत असून या संमेलनासाठी महाराष्ट्र वन विभाग सोलापूर व सामाजिक वनीकरण विभाग सोलापूर यांचे सहकार्याने लाभणार आहे.
सोलापूर नगरीत या पूर्वी १६ वे संमेलन १९९७ साली विहंग मंडळाने आयोजित केले होते. या संमेलनासाठी त्यावेळी माजी केंद्रीय मंत्री मनेका गांधी उपस्थित होत्या. या संमेलनाचे आयोजन करण्यासाठी त्यावेळी प्रा. डॉ. निनाद शहा हे प्रमुख होते.