अध्यक्ष, उपाध्यक्ष निवड सर्वसंमतीने करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2021 04:31 IST2021-02-23T04:31:16+5:302021-02-23T04:31:16+5:30

संगमनेर : अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेची निवडणूक चांगल्या पद्धतीने झाली. चार जगांकरिता झालेल्या निवडणुकीत एका जागेकरिता अपेक्षित निकाल आला ...

The President and Vice President will be elected by consensus | अध्यक्ष, उपाध्यक्ष निवड सर्वसंमतीने करणार

अध्यक्ष, उपाध्यक्ष निवड सर्वसंमतीने करणार

संगमनेर : अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेची निवडणूक चांगल्या पद्धतीने झाली. चार जगांकरिता झालेल्या निवडणुकीत एका जागेकरिता अपेक्षित निकाल आला नाही, हे दुर्दैवाने घडले. बँकेच्या अध्यक्ष, उपाध्यक्षपदाचा निर्णय आम्ही एकत्रित बसून घेणार आहोत, असे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी सांगितले.

जिल्हा सहकारी बँकेच्या निकालानंतर रविवारी महसूलमंत्री थोरात यांनी संगमनेरात पत्रकारांशी संवाद साधला. अहमदनगर जिल्हा सहकारी बँक ही महाराष्ट्रातील आदर्श बँक आहे. तिच्या माध्यमातून साखर कारखान्यांना कर्जाच्या रूपाने मदत होत असते. शेतकऱ्यांना शून्य टक्के व्याजदराने पीक कर्ज देण्याचा अभिनव उपक्रम या बँकेने केला आहे. ही महत्त्वाची बँक असून या बँकेची निवडणूक राजकारणविरहित केलेली आहे.

....

कारखानदारी आम्हाला टिकवायचीय

साखर कारखानदारी सगळ्यांकडे आहे. ती चांगल्या पद्धतीने चालली तर आर्थिक चलन चांगले फिरते. जिल्ह्यात साखर कारखानदारी चांगल्या पद्धतीने चालवण्याची पद्धत आहे. ही शिस्त आमच्याकडे असून ती आम्हाला टिकवायची आहे. त्यात राजकारणाचा गुंता आम्ही करीत नाही. ज्याला आवश्यक आहे, त्याला कर्जवाटप करणे, कारखाना चांगला चालविणे, त्यातून शेतकऱ्यांना मदत होत असते. हे जुने सूत्र असून तेच आम्ही टिकवतो आहे, असेही थोरात म्हणाले.

Web Title: The President and Vice President will be elected by consensus