बाळासाहेब थोरात म्हणाले, जिल्हा बँक अध्यक्ष, उपाध्यक्षांची निवड सर्वसंमतीनेच होणार, निवडणूक राजकारण विरहित केली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2021 15:03 IST2021-02-21T15:02:33+5:302021-02-21T15:03:23+5:30

अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेची निवडणूक चांगल्या पद्धतीने झाली. चार जगांकरिता झालेल्या निवडणुकीत एका जागेकरिता अपेक्षित निकाल आला नाही, हे दुर्दैवाने घडले. बँकेच्या अध्यक्ष, उपाध्यक्षपदाचा निर्णय आम्ही एकत्रित बसून करणार आहोत, असे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी सांगितले.

The President and Vice-President shall be elected unanimously, | बाळासाहेब थोरात म्हणाले, जिल्हा बँक अध्यक्ष, उपाध्यक्षांची निवड सर्वसंमतीनेच होणार, निवडणूक राजकारण विरहित केली

बाळासाहेब थोरात म्हणाले, जिल्हा बँक अध्यक्ष, उपाध्यक्षांची निवड सर्वसंमतीनेच होणार, निवडणूक राजकारण विरहित केली

संगमनेर : अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेची निवडणूक चांगल्या पद्धतीने झाली. चार जगांकरिता झालेल्या निवडणुकीत एका जागेकरिता अपेक्षित निकाल आला नाही, हे दुर्दैवाने घडले. बँकेच्या अध्यक्ष, उपाध्यक्षपदाचा निर्णय आम्ही एकत्रित बसून करणार आहोत, असे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी सांगितले.

जिल्हा सहकारी बँकेच्या निकालानंतर रविवारी दि.२१) महसूलमंत्री थोरात यांनी संगमनेरात पत्रकारांशी संवाद साधला. अहमदनगर जिल्हा सहकारी बँक ही महाराष्ट्रातील आदर्श बँक आहे. या बँकेच्या माध्यमातून साखर कारखान्यांना कर्जाच्या रुपाने मदत होत असते. शेतकऱ्यांना शून्य टक्के व्याजदराने पीक कर्ज देण्याचा अभिनव उपक्रम या बँकेने केला आहे. ही महत्त्वाची बँक असून या बँकेची निवडणूक राजकारण विरहित केलेली आहे.

साखर कारखानदारी सगळ्यांकडे आहे. ती चांगल्या पद्धतीने चालली तर आर्थिक चलन चांगले फिरते. जिल्ह्यात साखर कारखानदारी चांगल्या पद्धतीने चालवण्याची पध्दत आहे. ही शिस्त आमच्याकडे असून ती आम्हाला टिकवायची आहे. त्यात राजकारण असा गुंता आम्ही करत नाही, असेही थोरात म्हणाले.

Web Title: The President and Vice-President shall be elected unanimously,