दोघा आरोपींचा अटकपूर्व जामीन फेटाळला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2021 04:20 IST2021-03-06T04:20:28+5:302021-03-06T04:20:28+5:30
याप्रकरणी गुन्हा दाखल असलेल्यांपैकी मोहटादेवी ट्रस्टचे तत्कालीन विश्वस्त व पाथर्डी न्यायालयातील तत्कालीन प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एम.पी. त्रिभुवन व पाथर्डी पंचायत ...

दोघा आरोपींचा अटकपूर्व जामीन फेटाळला
याप्रकरणी गुन्हा दाखल असलेल्यांपैकी मोहटादेवी ट्रस्टचे तत्कालीन विश्वस्त व पाथर्डी न्यायालयातील तत्कालीन प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एम.पी. त्रिभुवन व पाथर्डी पंचायत समितीचे तत्कालीन गटविकास अधिकारी एस.एम. मुंढे यांनी अटकपूर्व जामिनासाठी जिल्हा न्यायालयात अर्ज केला होता. जिल्हा न्यायाधीश काळे यांच्यासमोर या अर्जावर सुनावणी झाली. जिल्हा न्यायाधीश हे ट्रस्टचे अध्यक्ष होते, त्यामुळे निर्णय प्रक्रियेत आमचा सहभाग नव्हता, असा युक्तिवाद त्रिभुवन यांच्यावतीने करण्यात आला. तर सोने पुरण्याबाबत विश्वस्तांची बैठक झाली तेव्हा त्या बैठकीला मी उपस्थित नव्हतो, असा युक्तिवाद मुंढे यांच्यावतीने करण्यात आला. आरोपी पक्षाचा हा युक्तिवाद जिल्हा सरकारी वकील ॲड. सतीश पाटील यांनी खोडून काढत या प्रकरणाचा तपास सुरू आहे. नेमके काय घडले होते, हे तपासत समोर येईल. त्यामुळे अर्जदारांचा अटकपूर्व जामीन अर्ज मंजूर करू नये, असा युक्तिवाद केला. दोन्ही बाजूचा युक्तिवाद झाल्यानंतर न्यायालयाने या दोघांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळून लावला.