प्रवरासंगम शाळेच्या विद्यार्थ्यांचा जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते गौरव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:30 IST2021-02-05T06:30:11+5:302021-02-05T06:30:11+5:30
नेवासा : जिल्हाधिकारी कार्यालय व जिल्हा परिषद अहमदनगर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित लोकसभा-विधानसभा स्वीप मोहिमेंतर्गत जिल्हाधिकारी कार्यालय येथे अकराव्या ...

प्रवरासंगम शाळेच्या विद्यार्थ्यांचा जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते गौरव
नेवासा : जिल्हाधिकारी कार्यालय व जिल्हा परिषद अहमदनगर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित लोकसभा-विधानसभा स्वीप मोहिमेंतर्गत जिल्हाधिकारी कार्यालय येथे अकराव्या राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त प्रभावी जनजागृती व स्पर्धेत प्रथम क्रमांक प्राप्त केल्याबद्दल नेवासा तालुक्यातील प्रवरासंगम जिल्हा परिषद शाळेच्या पाच विद्यार्थ्यांचा व त्यांच्या वर्गशिक्षिका शीतल झरेकर यांचा सन्मान जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांच्या हस्ते करण्यात आला.
नगरच्या नियोजन भवन येथे पार पडलेल्या मतदार दिनाच्या कार्यक्रमास उपजिल्हाधिकारी जितेंद्र पाटील, संदीप निचित, उपविभागीय पोलीस अधिकारी धुमे, उपवनसंरक्षक डॉ. आदर्श रेड्डी, इतिहास अभ्यासक प्रा. संतोष यादव, प्रांताधिकारी पल्लवी निर्मळ, सुधाकर भोसले, माध्यमिक शिक्षणाधिकारी रामदास हराळ, प्राथमिक उपशिक्षणाधिकारी विलास साठे आदी उपस्थित होते. यावेळी श्रावणी मते, गौरी पांडव, साई डावखर, प्रिया सुडके, प्रज्ञा पांडव या विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला.
या यशाबद्दल शिक्षणाधिकारी शिवाजी शिंदे, सभापती रावसाहेब कांगुणे, गटशिक्षणाधिकारी सुलोचना पटारे, अधीक्षक हेमलता गलांडे, विस्तार अधिकारी शिवाजी कराड, रेणुका चन्ना, विद्यादेवी सुंबे, मुख्याध्यापक राजेंद्र चापे, व्यवस्थापन समिती अध्यक्ष बाबासाहेब भालेराव आदींनी कौतुक केले.
फोटो : २५ प्रवरासंगम
प्रवरासंगम (ता. नेवासा) येथील जिल्हा परिषद शाळेतील पाच विद्यार्थ्यांचा जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांच्या हस्ते गौरव करण्यात आला.