बेलापूर शहरात प्रवरा नदीवरून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2021 04:17 IST2021-06-04T04:17:33+5:302021-06-04T04:17:33+5:30

श्रीरामपूर : बेलापूर येथील प्रवरा नदी पूल ते नाव घाटावरून शहरात येणारा रस्ता सार्वजनिक बांधकाम विभागाने वाहतुकीसाठी खुला करण्यात ...

From Pravara river in Belapur city | बेलापूर शहरात प्रवरा नदीवरून

बेलापूर शहरात प्रवरा नदीवरून

श्रीरामपूर : बेलापूर येथील प्रवरा नदी पूल ते नाव घाटावरून शहरात येणारा रस्ता सार्वजनिक बांधकाम विभागाने वाहतुकीसाठी खुला करण्यात आला. हा रस्ता पूर्ववत खुला करण्याचा शब्द गावकरी मंडळाचे ज्येष्ठ नेते सुनील मुथा यांनी ग्रामपंचायत निवडणूक प्रचारादरम्यान दिला होता. त्यानुसार जिल्हा परिषद सदस्य शरद नवले यांच्या विशेष प्रयत्नाने तसेच सरपंच महेंद्र साळवी, उपसरपंच अभिषेक खंडागळे यांच्या पाठपुराव्याने बांधकाम विभागाने गेट टाकून वाहतुकीस रस्ता खुला केला.

प्रवरा नदीवरील नावघाट ते बेलापूर बाजारपेठ असा पूर्वापार रस्ता होता. मात्र तो संरक्षक भिंत घालून बंद करण्यात आला होता. त्यामुळे व्यापारी, शेतकरी, विद्यार्थी, छोटे वाहतूकदार, दहावा घाटावर येणारे नागरिक आदींची गैरसोय होत होती. यामार्गे वाहतूक आणि वर्दळ बंद झाल्याने बाजारपेठही ओस पडली होती.

जिल्हा परिषद सदस्य शरद नवले यांनी पालकमंत्री हसन मुश्रीफ तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाकडे विशेष प्रयत्न केले. सरपंच महेंद्र साळवी, उपसरपंच अभिषेक खंडागळे यांनी सातत्याने या प्रस्तावाचा पाठपुरावा केला. त्यास यश आले.

रस्ता खुला होताच ज्येष्ठ नेते रणजित श्रीगोड, भाऊ डाकले, भास्कर बंगाळ, अशोक गवते, प्रफुल्ल डावरे, पुरुषोत्तम भराटे, प्रशांत लड्डा, शांतीलाल हिरण, यादव काळे, सचिन कोठारी, प्रवीण लुक्कड, मुस्ताक शेख, रमेश अमोलिक, प्रभात कुऱ्हे, गणेश बंगाळ आदींनी उद‌्घाटन केले.

--------

फोटो आहे : बेलापूर

बेलापूर येथील नावघाट ते बाजारपेठ दरम्यान रस्ता खुला होताच प्रमुख पदाधिकाऱ्यांनी उद‌्घाटन केले.

---

Web Title: From Pravara river in Belapur city

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.