प्रशांत भालेराव यांना अमेरिकेत डॉक्टरेट प्रदान
By | Updated: December 6, 2020 04:21 IST2020-12-06T04:21:58+5:302020-12-06T04:21:58+5:30
तीसगाव : अमेरिकेतील ग्लोबल पीस विद्यापीठाच्या वतीने शनिवारी रेणुकामाता बहुराज्यीय पतसंस्थेचे अध्यक्ष प्रशांत भालेराव यांना मानद डॉक्टरेट प्रदान करण्यात ...

प्रशांत भालेराव यांना अमेरिकेत डॉक्टरेट प्रदान
तीसगाव : अमेरिकेतील ग्लोबल पीस विद्यापीठाच्या वतीने शनिवारी रेणुकामाता बहुराज्यीय पतसंस्थेचे अध्यक्ष प्रशांत भालेराव यांना मानद डॉक्टरेट प्रदान करण्यात आली.
पतसंस्था व्यवस्थापनात नऊ राज्यांत गेल्या सोळा वर्षांत भालेराव यांनी दिलेल्या विशेष योगदानाबद्दल विद्यापीठ स्तरावरील जागतिक निवड समितीच्या सूचनेवरून हा बहुमान प्राप्त झाला आहे. ग्लोबल पीस विद्यापीठाचे अध्यक्ष डॉ. आर. सेलवम, भाजपचे गोवा राज्याचे सचिव गजानन राजन तिळवे यांच्या हस्ते भालेराव यांना मानद डॉक्टरेट प्रदान करण्यात आली.
जागतिक स्तरावर आपणास मिळालेला सन्मान व मानद डॉक्टरेटचा किताब हा संस्थास्तरावरील सार्वत्रिक घटकांचे योगदान व सदिच्छेचे प्रतीक आहे. धार्मिक, सामाजिक कार्य, कौटुंबिक हितचिंतकांच्या आशीर्वादाचे पाठबळ यास लाभले आहे, अशी भावना प्रशांत भालेराव यांनी यावेळी व्यक्त केली. यानिमित्त अमरापूर येथील रेणुकामाता देवस्थानात सायंकाळी मोठा आनंदोत्सव साजरा करण्यात आला.
फोटो : ०५ प्रशांत भालेराव
अमेरिकेतील ग्लोबल पीस विद्यापीठाच्या वतीने शनिवारी रेणुकामाता बहुराज्यीय पतसंस्थेचे अध्यक्ष प्रशांत भालेराव यांना मानद डॉक्टरेट प्रदान करण्यात आली.