मारुतराव घुले कोविड सेंटरमधील रूग्णांसाठी प्राणायाम शिबिर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2021 04:20 IST2021-04-24T04:20:42+5:302021-04-24T04:20:42+5:30
शेवगाव : येथील स्वर्गीय मारुतराव घुले कोविड सेंटरमधील कोरोना बाधित रुग्णांना सकस आहार, वेळच्यावेळी औषधे, शुद्ध पाणी मिळते की ...

मारुतराव घुले कोविड सेंटरमधील रूग्णांसाठी प्राणायाम शिबिर
शेवगाव : येथील स्वर्गीय मारुतराव घुले कोविड सेंटरमधील कोरोना बाधित रुग्णांना सकस आहार, वेळच्यावेळी औषधे, शुद्ध पाणी मिळते की नाही याची पाहणी करून पंचायत समितीचे सभापती डॉ. क्षितिज घुले व बाजार समिती सभापती ॲड. अनिल मडके यांनी कोविड सेंटर येथे सूचना केल्या. येथील जेवण घुले यांनी स्वत: खाऊन पाहिले. येथे शनिवारपासून (दि.२४) रूग्णांसाठी प्राणायाम शिबिराचे आयाेजन करण्यात आले आहे.
शहरातील बाजार समितीच्या प्रांगणाशेजारील मंगल कार्यालयात माजी आमदार नरेंद्र घुले व चंद्रशेखर घुले यांनी बाधित रुग्णांच्या सेवेसाठी १०० बेडचे लोकनेते स्व. मारुतरावजी घुले पाटील कोविड सेंटर सुरु केले आहे. येथे सध्या २५ रुग्ण उपचार घेत असून दररोज सेंटरमध्ये रुग्णांची संख्या वाढत आहे. कोविड सेंटरमध्ये दाखल होणाऱ्या रुग्णांसाठी औषधी गोळ्या, वेळच्यावेळी तज्ज्ञांकडून आरोग्य तपासणी, शुद्ध पाणी, दोन वेळेस सकस आहार अशी रुग्णांची व्यवस्था केली जात आहे. या कामासाठी परिचारिका, कामगार येथे अहोरात्र परिश्रम घेत असून वैद्यकीय अधिकारीही रोज भेटी देत आहेत.
कमलेश लांडगे, कृष्णा सातपुते, रोहन साबळे, समीर शेख आदी उपस्थित होते. शनिवारपासून कोरोना बाधित रूग्णांसाठी आठ दिवस दररोज सकाळी एक तास प्राणायाम शिबिराचे आयोजन केले आहे.
---
२३ शेवगाव कोविड
शेवगाव येथील मारुतराव घुले कोविड सेंटरमधील आहार कसा आहे हे पंचायत समिती सभापती डॉ. क्षितिज घुले यांनी स्वत: खाऊन पाहिले.