मुस्लिम स्वयंसेवक संघाच्या वतीने कोरोना हुतात्मा देशभक्ती कृतज्ञता प्रभात फेरीचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये मुस्लिम स्वयंसेवक संघाच्या महिला व पुरुष स्वयंसेवकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेत उपविभागीय अधिकारी कार्यालयापासून बसस्थानक मार्गे छत्रपती शिवाजी महाराज व महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकास पुष्पहार अर्पण करत सय्यद बाबा चौकात हजरत सय्यद बाबा यांच्या दर्गाहला फूल, चादर अर्पण करून या कोरोना हुतात्मा देशभक्ती प्रभात फेरीची सांगता करण्यात आली. यावेळी उपविभागीय दंडाधिकारी डॉ. शशिकांत मंगरुळे, संगमनेर तहसीलदार अमोल निकम, उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल मदने यांनी श्रद्धांजली वाहिली.
मुस्लिम स्वयंसेवक संघाच्या वतीने ज्येष्ठ समाजसेवक अब्दुल्लाह हसन चौधरी, डॉ. जी. पी. शेख, निसारखान पठाण, शब्बीर मोमीन, रफीक सय्यद, मुनव्वर सर, कादर इनामदार, हुसैन पटेल, मोहम्मद तांबोळी, मुख्तार पिंजारी, अनिस नवाब शेख, फिरोज शेख, मुजम्मील शेख, सलमान शेख, दानिश पठाण, इर्शाद पठाण, शाहरुख रंगरेज, फैजान मनियार, अफ्फान शेख, रेहान शेख, अरहान शेख, अरमान पठाण, दानिश मनियार, मोहम्मद अली मनियार, जमीर शेख, अरबाज शेख, फैसल शेख, जावेद शेख, इर्शाद शेख, मुदस्सर शेख, शौकत पठाण, बानोबी शेख, मुमताज पठाण, सविता दिघे, लक्ष्मीबाई कोन्का, रेश्मा शेख, मैमुना शेख, हुमैरा शेख, करिष्मा शेख, मसिरा शेख, सानिया पठाण, सायरा शेख, सुरैय्या शेख, शमा शेख, सकीना पठाण यांनी सहभाग घेतला होता.