मुळा धरणावर वीज प्रकल्प
By Admin | Updated: July 7, 2016 23:24 IST2016-07-07T23:19:38+5:302016-07-07T23:24:15+5:30
राहुरी : मुळा धरणावर खासगी कंपनीने शासनाशी करार करत वीज प्रकल्पाची निर्मिती केली आहे. धरण पूर्ण भरून कालव्यातून पाणी सोडले

मुळा धरणावर वीज प्रकल्प
राहुरी : मुळा धरणावर खासगी कंपनीने शासनाशी करार करत वीज प्रकल्पाची निर्मिती केली आहे. धरण पूर्ण भरून कालव्यातून पाणी सोडले तरच प्रकल्प कार्यान्वित होणार असल्याने आता प्रकल्पालाही पावसाची वाट पहावी लागणार आहे.
मुळा धरणाच्या पायथ्याशी उजव्या कालव्यावरपुणे येथील कामदार इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीने ३० वर्षांच्या कराराने हा प्रकल्प शासनाकडून घेतला आहे़ इमारतीचे बांधकाम पूर्ण झाल्यानंतर वीज निर्मितीसाठी लागणारी टर्बाइन, जनरेटर, गिअर बॉक्स, कंट्रोल पॅनल, सबस्टेशन आदी ४० कोटींची यंत्रसामुग्री उभारणीचे काम दोन महिन्यांपूर्वी पूर्ण झाले आहे. धरण भरले तर उजव्या कालव्यावर आधारित असलेला हा प्रकल्प कार्यान्वित होऊ शकतो़
त्यामुळे वीज प्रकल्पालाही आता पावसाची प्रतीक्षा आहे. तासाला चार मेगावॅट विजेची निर्मिती या प्रकल्पातून होणार असून, पुढे ही वीज बारागाव नांदूर येथील उपकेंद्रातून महावितरणला विकली जाणार आहे.
(तालुका प्रतिनिधी)