बन्सीभाऊ म्हस्के यांना मरणोत्तर जीवनगौरव पुरस्कार प्रदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 15, 2021 04:24 IST2021-08-15T04:24:00+5:302021-08-15T04:24:00+5:30

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष तथा माजी आमदार नंदकुमार झावरे होते. यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष रामचंद्र दरे, सचिव जी.डी. खानदेशे, सहसचिव ...

Posthumous Lifetime Achievement Award presented to Bansibhau Mhaske | बन्सीभाऊ म्हस्के यांना मरणोत्तर जीवनगौरव पुरस्कार प्रदान

बन्सीभाऊ म्हस्के यांना मरणोत्तर जीवनगौरव पुरस्कार प्रदान

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष तथा माजी आमदार नंदकुमार झावरे होते. यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष रामचंद्र दरे, सचिव जी.डी. खानदेशे, सहसचिव ॲड. विश्वासराव आठरे पाटील, न्यू आर्टस्‌ महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. भास्करराव झावरे, बाबासाहेब गुंजाळ आदींची उपस्थिती होती.

यावेळी बोलताना झावरे म्हणाले की, स्व. माधवराव मुळे यांचे शैक्षणिक, सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातील योगदान मोठे आहे. नगरमधील गोरगरीब कुटुंबांतील मुले उच्चशिक्षित व्हावीत, यासाठी त्यांनी केलेले कार्य उल्लेखनीय आहे. या कार्यक्रमात ॲड. विश्वासराव आठरे व माजी कुलगुरू डॉ. सर्जेराव निमसे यांनी ऑनलाइन सहभागी होत विचार व्यक्त केले.

प्रास्ताविक प्रतिष्ठानचे अध्यक्ष मुकेश मुळे यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. गणेश भगत यांनी केले. प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष दत्ता नारळे यांनी आभार मानले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रतिष्ठानचे सचिव प्रा. एम.एम. तांबे , खजिनदार बजरंग पाडळकर, प्रा. लालासाहेब हराळ, डॉ. महेश मुळे, मीनाताई पोटे आदींनी परिश्रम घेतले.

फोटो १४ पुरस्कार

फोटो ओळी : शिक्षणमहर्षी स्व. माधवराव मुळे प्रतिष्ठानच्या वतीने देण्यात येणारा स्व. माधवराव मुळे स्मृती जीवनगौरव पुरस्कार स्व. बन्सीभाऊ म्हस्के यांना मरणोत्तर प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे सचिव जी.डी. खानदेशे यांच्या हस्ते स्वीकारताना संपतराव म्हस्के व पद्मावती म्हस्के. समवेत डावीकडून मुकेश मुळे, रामचंद्र दरे, माजी आमदार नंदकुमार झावरे, ॲड. विश्वासराव आठरे.

Web Title: Posthumous Lifetime Achievement Award presented to Bansibhau Mhaske

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.