डाक जीवन विम्याचे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2021 04:28 IST2021-06-16T04:28:19+5:302021-06-16T04:28:19+5:30

श्रीरामपूर : राहुरी येथील अनंत सुभाष तांबे यांच्या निधनानंतर त्यांच्या कुटुंबीयांना डाक जीवन विमा योजनेचे २५ लाख ६३ हजार ...

Postal life insurance | डाक जीवन विम्याचे

डाक जीवन विम्याचे

श्रीरामपूर : राहुरी येथील अनंत सुभाष तांबे यांच्या निधनानंतर त्यांच्या कुटुंबीयांना डाक जीवन विमा योजनेचे २५ लाख ६३ हजार रुपयेे देण्यात आल्याची माहिती अधीक्षक एस. रामकृष्ण यांनी दिली.

औरंगाबाद येथे शासकीय सेवेत असताना तीन वर्षांपूर्वी तांबे यांनी पोस्टात डाक जीवन विमा योजनेत २० लाख रुपयांचा विमा घेतला. मागील महिन्यात त्यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांचे वडील सुभाष तांबे यांनी राहुरी येथील पोस्टमास्तर महेश कोबरने व विकास अधिकारी विजय कोल्हे यांना याविषयी माहिती दिली.

त्यानंतर तत्काळ अर्ज भरून आवश्यक कागदपत्रे जमा करण्यात आली. दाव्याची पूर्तता करण्यात आली. केवळ आठ दिवसांत वारसदार सुभाष तांबे यांना २५ लाख ६३ हजार रुपयांचा धनादेश प्रदान करण्यात आला.

शासकीय, निमशासकीय व शैक्षणिक क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना पोस्ट खाते विमा सेवा देत असून, त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन विजय कोल्हे यांनी केले आहे.

Web Title: Postal life insurance