शहरं
Join us  
Trending Stories
1
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
2
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
3
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
4
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
5
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
6
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
7
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
8
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
9
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
10
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
11
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
12
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
13
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
14
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
15
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
16
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
17
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
18
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
19
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
20
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

नगराध्यक्षांनी पदाचा राजीनामा द्यावा

By admin | Updated: August 24, 2016 00:43 IST

शिर्डी : उपनगराध्यक्ष निलेश कोते यांनी साधनाताई लुटे यांना उपनगराध्यक्ष पदाची संधी मिळावी या करीता राजीनामा दिला, तसाच नगराध्यक्षा अनिता जगताप यांनीही

शिर्डी : उपनगराध्यक्ष निलेश कोते यांनी साधनाताई लुटे यांना उपनगराध्यक्ष पदाची संधी मिळावी या करीता राजीनामा दिला, तसाच नगराध्यक्षा अनिता जगताप यांनीही मनाचा मोठेपणा दाखवत राजीनामा देऊन आपल्याला नगराध्यक्ष पदाची संधी द्यावी, अशी मागणी नगरसेवक व शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख अभय शेळके पाटील यांनी केली़नगराध्यक्ष पदावर काम करण्याची संधी मिळाली तर महिनाभरात शिर्डीचे चित्र बदलवून टाकू अशी ग्वाही देतांनाच याबाबत नगराध्यक्षांनी दोन दिवसात निर्णय घेतला नाही तर आपण वेगळा निर्णय घेऊ अशी गर्भित धमकीही शेळके यांनी नगराध्यक्षा जगताप यांना पाठवलेल्या पत्रात दिली आहे़ या पत्रात म्हटले आहे की, शिर्डी नगरपंचायतच्या माध्यमातून गेल्या साडेचार वर्षात जनतेशी निगडीत जेवढी दैनंदिन कामे झाली नाहीत ती सर्व कामे केवळ एका महिन्यात करुन दाखवेल, याची आपल्यासह संपूर्ण शिर्डी शहरातील नागरिकांना खात्री आहे. शहरात नवीन रस्ते, नवीन पिण्याचे पाणी योजना, नवीन ड्रेनेज हे विषय सोडले तर कचरा, स्वच्छता, अतिक्रमण, पिण्यासाठी नियमित वेळेत पाणी, तत्पर प्रशासन, मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त, भिकारी, नागरिकांना शिस्त लावणे, संरक्षण, शहरातील बेकायदा प्रवासी वाहतूक हे सर्व प्रश्न मार्गी लावण्याची ग्वाहीही शेळके यांनी दिली आहे़हे पत्र आपण नगराध्यक्षांना देत असलो तरी आपला रोख नगराध्यक्षांचे पतीराज विजय जगताप यांच्याकडे असून त्यांनी याबाबत मनाचा मोठेपणा दाखवत दोन दिवसात सकारात्मक निर्णय घ्यावा, अन्यथा आपण वेगळा निर्णय घेऊ व नंतर त्यापासून मागे हटणार नाही असा इशाराही शेळके यांनी दिला आहे़ (तालुका प्रतिनिधी)