दुधाच्या एफआरपीबाबत सकारात्मक चर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2021 04:14 IST2021-07-09T04:14:59+5:302021-07-09T04:14:59+5:30
संगमनेर तालुका सहकारी दूध उत्पादक व प्रक्रिया संघाच्यावतीने गुरुवारी (दि. ८) आयोजित चारा पीक पाहणी कार्यक्रमात ते बोलत होते. ...

दुधाच्या एफआरपीबाबत सकारात्मक चर्चा
संगमनेर तालुका सहकारी दूध उत्पादक व प्रक्रिया संघाच्यावतीने गुरुवारी (दि. ८) आयोजित चारा पीक पाहणी कार्यक्रमात ते बोलत होते.
जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. सुनील तुंबारे, जिल्हा परिषदेचे सदस्य मिलिंद कानवडे, सीताराम राऊत, पांडुरंग पाटील, ॲड. बाबासाहेब गायकर, भास्कर सिनारे, सोमनाथ जोंधळे, अनिल बोटे, डॉ. जालिंदर तिटमे, डॉ. प्रशांत पोखरकर, डॉ. सुजित खिलारी, डॉ. संतोष वाकचौरे, विलास उंबरकर, किसन शिंदे, डॉ. बाळासाहेब वाकचौरे, डॉ. कृष्णा घोगरे, डॉ. आशुतोष रहाणे, डॉ. प्रमोद पावसे, आशिष देवताळे, योगेश हासे, शुभम सरनाईक, बबनराव राऊत, आदी उपस्थित होते.
देशमुख म्हणाले, जनावरांचे लसीकरण, जंतनिर्मूलन व गोठ्यातील स्वच्छता याचबरोबर सकस चारा जनावरांना देणे गरजेचे आहे. जास्तीत जास्त दूध देणाऱ्या गाई निर्माण करण्यासाठी महाविकास आघाडी सरकारच्या माध्यमातून उच्च प्रतीच्या वीर्यमात्रा स्वस्त दरात म्हणजे फक्त ८१ रुपयांत शेतकऱ्यांना दिल्या जाणार असल्याने दुग्ध व्यवसायात शेतकऱ्यांचे भवितव्य उज्ज्वल आहे. कमी खर्चात दुधाचे उत्पादन वाढविण्यासाठी १५०० रुपये किमतीच्या उच्च प्रतीच्या विदेशी वीर्यमात्रा महाविकास आघाडी सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांना कमीत कमी किमतीत उपलब्ध केल्या जाणार आहे. भविष्यात जास्त दूध देणाऱ्या गाई तयार होतील. त्यामुळे शेतकऱ्यांच्या कुटुंबात आर्थिक सुबकता येईल. संगमनेर तालुक्यातील शेतकऱ्यांनी दूध उत्पादनात क्रांती केली असून, सर्वाधिक दुधाचा पुरवठा करण्यामध्ये आज तालुका अग्रेसर आहे.
राजहंस दूध संघाच्या माध्यमातून दूध उत्पादक शेतकऱ्यांना चारा पिकासाठी ११० मेट्रिक टन मका बियाणे मोफत वाटप करण्यात आहे, तर दुग्ध व्यवसायातील कष्ट कमी व्हावे यासाठी मुरघास जनजागृती कार्यक्रम राबवून शेतकऱ्यांमध्ये जनजागृती केली गेली. मुरघासच्या माध्यमातून दुधाचे उत्पादन वाढण्यास मोठी मदत झाली. दुष्काळी भागात उन्हाळ्यात जनावरांचा चाऱ्याचा प्रश्न सुटल्यामुळे शेतकरी दुग्ध व्यवसायाकडे आकर्षित झाले. जास्तीत जास्त दुधाचे उत्पादन वाढविण्यासाठी राजहंस दूध संघाच्या माध्यमातून अनुदानित तत्त्वावर अनेक नावीन्यपूर्ण योजनाही राबविण्यात येत आहेत.