पहिल्याच पावसात पाण्याचे तळे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2021 04:16 IST2021-06-06T04:16:10+5:302021-06-06T04:16:10+5:30
दोन वर्षांपूर्वी म्हणजेच अगोदरच्या सरकारच्या काळात अकोले तालुक्यातील बारी ते संगमनेर रस्त्याचे काम सुरू झाले. यासाठी कोट्यवधी रुपयांचा निधी ...

पहिल्याच पावसात पाण्याचे तळे
दोन वर्षांपूर्वी म्हणजेच अगोदरच्या सरकारच्या काळात अकोले तालुक्यातील बारी ते संगमनेर रस्त्याचे काम सुरू झाले. यासाठी कोट्यवधी रुपयांचा निधी मंजूर झालेला आहे. यात बारीपासून कामास शुभारंभ झाला. बारी ते अकोलेपर्यंत विठा घाटवगळता काही ठिकाणी रस्त्याचा एक थर पूर्ण झाला, तर काही ठिकाणी यातील निम्म्या रस्त्याचा एक थर पूर्ण झाल्याचे दिसत आहे. या रस्त्यावर असलेल्या सर्वच पुलांचे काम बाकी आहे. काम सुरू असलेल्या पुलांजवळ शेजारील शेतजमिनीतून पर्यायी रस्ते तयार केले असले, तरी पावसाळा सुरू झाल्याने या रस्त्याने हा पर्यायी रस्ता चिखलमय होत आहे. तर, अद्यापही सुरू न झालेल्या पुलांवर रस्त्याची कामेच सुरू झाली नाहीत. या ठिकाणी रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहेत. तर, पहिल्याच पावसात या ठिकाणी पाणीही साचले आहे. त्यामुळे या ठिकाणांहून प्रवास करताना पाणी साचलेले असल्याने कोणत्या ठिकाणी मोठा खड्डा आहे, हे लक्षात येत नसल्याने चालकांना तसेच पादचाऱ्यांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे.
फोटो - राजूर