नगर तालुक्यात मतदान यंत्रे सिलिंग प्रक्रिया सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 04:51 IST2021-01-13T04:51:41+5:302021-01-13T04:51:41+5:30
केडगाव : नगर तालुक्यातील ५६ ग्रामपंचायतींमधील ४९७ सदस्यांच्या निवडीसाठी शुक्रवारी मतदानाची प्रक्रिया होणार आहे. त्याची तयारी सुरू करण्यात आली ...

नगर तालुक्यात मतदान यंत्रे सिलिंग प्रक्रिया सुरू
केडगाव : नगर तालुक्यातील ५६ ग्रामपंचायतींमधील ४९७ सदस्यांच्या निवडीसाठी शुक्रवारी मतदानाची प्रक्रिया होणार आहे. त्याची तयारी सुरू करण्यात आली असून मतदान यंत्र सिलिंग व मतदान अधिकाऱ्यांना मतदान यंत्र हाताळण्याचे प्रशिक्षण सुरू झाले आहे.
तालुक्यातील ५६ ग्रामपंचायतींच्या मतदानाची तयारी तालुका निवडणूक निर्णय अधिकारी उमेश पाटील तथा सहायक निवडणूक अधिकारी अभिजित बारवकर यांनी सुरू केली आहे. पाइपलाइन रोड परिसरातील पाऊलबुध्दे विद्यालयात इलेक्ट्रॉनिक्स मतदान यंत्रे सिलिंग करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली. यावेळी उमेदवार व त्यांचे प्रतिनिधीही उपस्थित होते. त्यांच्या समोरच सिलिंग प्रक्रिया सुरू करण्यात आली. तालुक्यात १९९ प्रभाग असून त्यासाठी २१९ मतदान केंद्राची निर्मिती करण्यात आली आहे. मतदान प्रक्रियेसाठी जवळपास दीड हजार कर्मचाऱ्यांची २७६ पथके निवडण्यात आली. त्यांना दोन टप्प्यात प्रशिक्षण देण्यात आले. सलग चार दिवस त्यांना प्रत्यक्ष मतदान यंत्रे हाताळण्याचे प्रशिक्षण देण्यात येत आहे. दररोज ७० पथकांमधील ३०० मतदान अधिकाऱ्यांना हे प्रशिक्षण देण्यात येत आहे, असे पाटील यांनी सांगितले.