जिल्ह्यातील ७० ग्रामपंचायतीसाठी उद्या मतदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2018 19:38 IST2018-05-26T19:36:22+5:302018-05-26T19:38:47+5:30
जून ते सप्टेंबर २०१८ या कालावधीत मुदत संपणाऱ्या ७० ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी रविवारी (दि. २७) मतदान होत आहे. या गावांतील एकूण ८१६ जागांपैकी १४१ जागा आधीच बिनविरोध झाल्या आहेत.

जिल्ह्यातील ७० ग्रामपंचायतीसाठी उद्या मतदान
अहमदनगर : जून ते सप्टेंबर २०१८ या कालावधीत मुदत संपणाऱ्या ७० ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी रविवारी (दि. २७) मतदान होत आहे. या गावांतील एकूण ८१६ जागांपैकी १४१ जागा आधीच बिनविरोध झाल्या आहेत. यात तीन ग्रामपंचायतींचा समावेश आहे. निवडणूक शाखेने सर्व तयारी पूर्ण केली आहे.
७० गावांत सरपंचपदासाठी १९६, तर सदस्यपदासाठी १०८७ जण रिंगणात आहेत. अर्ज माघारीच्या दिवशी बोरबन (ता. संगमनेर), गंगापूर (ता. राहुरी) व शेकटे बुद्रूक (ता. शेवगाव) या ग्रामपंचायती सरपंच व सर्व सदस्यांसह बिनविरोध ठरल्या. संवेदनशील मतदान केंद्रांवर आवश्यक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. मतदान केंद्र अधिकारी आपापल्या मतदान केंद्रावर शनिवारी रात्रीच दाखल झाले.