पोलीस ठाणे बनलेय भंगाराचे दुकान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2021 04:14 IST2021-07-23T04:14:06+5:302021-07-23T04:14:06+5:30
लोणी आणि राहाता पोलीस ठाण्यांचे आवार दुचाकी आणि चारचाकी वाहनांनी भरले आहे. पोलीस ठाण्यांच्या हद्दीत बेवारस आढळलेल्या, विविध चोऱ्या ...

पोलीस ठाणे बनलेय भंगाराचे दुकान
लोणी आणि राहाता पोलीस ठाण्यांचे आवार दुचाकी आणि चारचाकी वाहनांनी भरले आहे. पोलीस ठाण्यांच्या हद्दीत बेवारस आढळलेल्या, विविध चोऱ्या व इतर गुन्ह्यांत वापरलेल्या आणि अपघात झालेल्या दुचाकी गेल्या सात ते आठ वर्षांपासून पोलीस ठाण्यांच्या आवारात उभ्या आहेत. लोणी, राहाता या दोन्ही ठिकाणच्या जवळपास सातशेच्या वर महागड्या किमतीच्या दुचाकी गाड्या अनेक वर्षांपासून ऊन, वारा, पावसामुळे वाहनांना गंज चढला आहे.
लोणी आणि राहाता पोलीस स्टेशनच्या सहायक पोलीस निरीक्षकांनी या वाहनांचे चेसी नंबर घेऊन उपप्रादेशिक परिवहन अधिकारी श्रीरामपूर यांना वाहन मालकाची माहिती मागून घेतली; पण बेवारस असलेल्या दुचाकी मालकांना वारस मिळाला नाही. चोरी झालेल्या दुचाकी वाहनांची माहिती घेण्यासाठी नागरिक पोलीस ठाण्यात येतात. परंतु, अनेकदा पोलिसांकडून योग्यप्रकारे माहिती मिळत नसल्यामुळे दुचाकी सापडूनही त्या व्यक्तीला ती ताब्यात मिळत नाही. बेवारस, चोरीच्या गुन्ह्यात वापरलेल्या व अपघातातील वाहने अनेक वर्षांपासून याठिकाणी पडून आहेत. ट्रॅक्टर ट्रॉली, ट्रक, जीप ही वाहने अनेक वर्षांपासून या ठिकाणी आहेत.
....................
बेवारस अवस्थेत मिळून आलेल्या या दुचाकींचे नंबर अस्पष्ट असल्याने आरटीओ कार्यालयाकडून दुचाकी मालकांचे नाव व पत्ते मिळून येत नाहीत. त्यामुळे लोणी पोलीस ठाण्याच्या आवारात दुचाक्या पडून आहेत. ज्यांच्या दुचाकी चोरीस गेल्या आहेत, त्यांनी ओळख पटवून परत घेऊन जाव्यात; अन्यथा वाहनांचा लिलाव केला जाणार आहे.
-समाधान पाटील, सहायक पोलीस निरीक्षक, लोणी.
220721\img20210722104401.jpg
राहाता,लोणी पोलीस स्टेशन आवारातील बेवारस दुचाकी लिलावाच्या प्रतिक्षेत